Farmers in Sondale area are Fasting for Compensation 
उत्तर महाराष्ट्र

मोबदल्यासाठी लाक्षणिक उपोषण, सोंडले परिसरातील शेतकऱ्यांचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा

सोनगीरः तापी नदीतून जामफळ प्रकल्प भरून घेण्याच्या योजनेंतर्गत बुडीत क्षेत्रातील शेतजमिनीला जास्तीत जास्त मोबदला मिळावा, यासाठी येथील सोंडले (ता. शिंदखेडा) शिवारातील शेतकरी लाक्षणिक उपोषण करणार असून, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले जाईल. याबाबत येथील सोमेश्वर मंदिराच्या प्रांगणात काल (ता. 29) शेतकऱ्यांची बैठक झाली. तीत हा निर्णय घेण्यात आला. 

दरम्यान, प्रकल्पबाधित शेतकऱ्यांची संघर्ष समिती स्थापन करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना शिरपूर उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल यांच्या सहीच्या नोटिसा मिळाल्या असून, मोजणीसंदर्भात हरकती मांडण्यासाठी एक फेब्रुवारीला शिरपूरला बोलावण्यात आले आहे. पुढे काय करावे, यावर विचारविनिमयासाठी सर्व शेतकरी एकत्रित आले होते. 

सुलवाडे- जामफळ-कनोली उपसा सिंचन योजनेचे काम वेगात सुरू असून, 2022 मध्ये प्रकल्प पूर्ण करणे ठेकेदाराला बंधनकारक आहे. प्रकल्पांतर्गत शेकडो शेतकऱ्यांची शेतजमीन जात असली, तरी अद्याप तिचे संपादन झालेले नाही. शेतीची मोजणी झाली आहे. मात्र, शेतकऱ्यांना अद्याप मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले असून, त्यांचा धीर सुटला आहे. शेतीला एकरी भाव काय मिळेल, याबाबतही उलटसुलट चर्चा सुरू असून, शेतकरी अस्वस्थ आहेत. त्यांचे उत्पन्नाचे व उदरनिर्वाहाचे साधन तर गेले. मिळेल त्या रकमेत उर्वरित आयुष्य घालवायचे असल्याने मिळणारा मोबदला पुरेसा असावा, अशी त्यांची मागणी आहे.

या पार्श्वभूमीवर शेतकरी कैलास पाटील, केदारेश्वर मोरे, राजेंद्र झेंडू महाजन, पराग देशमुख, प्रकाश परदेशी, संजय परदेशी, हरिश्चंद्र पाटील, पंकज पाटील, विलास पाटील, निलेश बडगुजर आदी बैठकीस उपस्थित होते. आता माघार नाही आणि आता नाही तर पुढे कधी नाही, असा निर्णय घेण्यात आला. लवकरच लाक्षणिक उपोषण करण्याचे ठरले. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. बुडीत क्षेत्रातील शेतमालक, हिस्सा, करार आदींबाबत माहिती व मोजणीबाबत हरकत नोंदणीसाठी शेतकऱ्यांना शिरपूरला बोलावण्यात आले आहे. त्यामुळे पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, तो किती मिळेल याबाबत शेतकऱ्यांमध्ये बेचैनी आहे. 

शेतकऱ्यांना शेतीची रक्कम जास्तीत जास्त एकरकमी व त्वरित मिळावी, यासाठी लवकरच शेतकऱ्यांची संघर्ष समिती स्थापन करण्यात येणार आहे. हा लढा गतिमान करण्यासाठी पुन्हा शेतकऱ्यांची बैठक घेण्यात येईल. 
- कैलास पाटील, प्रकल्पबाधित शेतकरी, सोनगीर 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT