Power cut
Power cut esakal
उत्तर महाराष्ट्र

शेतात दिवसभर बत्तीगुल; अंधारात करावी लागताय बळीराजाला शेतीची कामे

सकाळ वृत्तसेवा

म्हसदी : यंदा मार्चपासून पारा चाळीशीपुढे होता. जून उजाडला तरी उन्हाचे चटके काही कमी होत नसल्याचे चिन्हे आहेत. दुसरीकडे ग्रामीण भागात शेतशिवारात चक्राकार पद्धतीने भारनियमन सुरू आहे. रात्री नऊ ते सकाळी पाच वाजेपर्यंत वीज पुरवठा देऊन शेत शिवारात दिवसभर ‘बत्ती’ गुल असते. रात्री वीज पुरवठा केला जातो. यामुळे भाजीपाला आणि फळे बागायतदार शेतकऱ्यांची मोठी अडचण होत आहे.

पिकांना ठिबक सिंचनाद्वारे खतांची मात्रा देताना अंधारात चाचपडत काम करावे लागते. शासनाचे धोरण,वितरण कंपनीचे नियम अथवा विजेच्या तुटवड्यामुळे भारनियमन केले जात असले तरी शेतकऱ्यांच्या कामाच्या वेळा पाहून तरी भारनियमन करावे अशी अपेक्षा बळिराजा करत आहे. वेळेत बदल करत रात्री उशिरा सुरू झालेला वीज पुरवठा सकाळी आठ वाजेपर्यंत सुरू ठेवावा अशी मागणी केली जात आहे. गेल्या वर्षी दमदार पावसामुळे जलस्तराची पातळी टिकून आहे. भारनियमनाचे चक्र त्या-त्या भागात भिन्न-भिन्न असले तरी भाजीपाला, फळ बागायतदार शेतकऱ्यांसह अन्य शेतकरीही हतबल झाला आहे.

रात्रीच्या भारनियमनात बदल करावा

म्हसदीसह ककाणी, भडगाव, राजबाई, शेवाळी, काळगाव आदी ठिकाणी शेतकरी भाजीपाल्यात शेवगा, फळ पिकात सीताफळ, डाळिंब, टरबूज, खरबूज, डांगर यासारखी पिके घेतो. सध्या शेवगा, डाळिंब सारख्या पिकांना ठिबक सिंचनाद्वारे रासायनिक खते व इतर तत्सम पोषक घटक दिले जातात. तंत्रशुद्ध पद्धतीने शेतीत कमालीचा बदल झाल्याने सध्या शेती परवडत असल्याचे शेतकरी सांगत असले तरी भारनियमनामुळे रात्रीच्या वेळेस वीज पुरवठा असला तरी योग्य मात्रा देताना अंधारात चाचपडत काम करावे लागत असल्याचे शेतकरी सांगतात. शेतकऱ्यांना अवघ्या दोन तासात ठिबक सिंचनाद्वारे पाणी द्यावे लागत आहे. कंपनीने सुरू केलेले वेळापत्रक चुकीचे असून यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. वेळापत्रकात बदल करण्याची मागणी केली जात आहे.

''भारनियमन नित्याचेच असले तरी वीज कंपनीने वेळा तरी पाहून भारनियमन करावे. रात्रभर वीज असूनही कामे होत नाही. दिवसा दोन तास जास्तीची वीज मिळाली तर अनेक प्रश्न सुटणार आहेत.'' - गोरख बेडसे, फळ बागायतदार शेतकरी, ककाणी.

''शासन आणि वीज कंपनीच्या वरिष्ठांच्या आदेशानुसार भारनियमन करणे क्रमप्राप्त आहे. शेतकऱ्यांची गैरसोय होत असली तरी सध्याच्या परिस्थितीनुसार वीज वितरण कंपनीस सहकार्य करावे.'' - योगेश खैरनार, कनिष्ठ अभियंता, वीज उपकेंद्र, म्हसदी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT