Farmers suicide in sakora
Farmers suicide in sakora 
उत्तर महाराष्ट्र

रेल्वेखाली उडी घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळवृत्तसेवा

साकोरा : येथिल शेतकरी सुनिल बाजीराव बोरसे (51) यांनी सततची नापिकी, यावर्षी अत्यल्प झालेल्या पावसाने केलेला खर्च वसूल होणार नसल्याने तसेच सावकारी कर्जाला कंटाळून आज सकाळी नांदगाव रेल्वेस्थानक ते रेल्वे गेट दरम्यान रेल्वेखाली उडी घेवून आपली जीवनयात्रा संपविली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, एक महिन्यांपूर्वी साकोरा येथिल मच्छिंद्र बोरसे या तरून शेतकऱ्याने रेल्वेखाली उडी घेवून आत्महत्या केली होती. ही घटना ताजी असतानाच आज सकाळी पून्हा साकोरा येथिल शेतकरी सुनिल बोरसे याने भुसावळ कडे जाणार्‍या रेल्वेखाली उडी घेवून आत्महत्या केली. नांदगाव तालुक्यात यावर्षी सर्वात कमी पाऊस झाला असून आपल्या उपजीविकेचे साधन म्हणून शेतीत दुबार पेरणी करूनही डोळ्यासमोर पीक जळत असल्याचे पाहून त्यासाठी दोन लाख रुपये खाजगी कर्ज कसे फेडायचे त्याचप्रमाणे गेल्या वर्षी मुलीचे लग्न झाले. या सर्व कारणामुळे बोरसे यांनी आपली जीवनयात्रा संपविली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, वृद्ध आई-वडील असा परिवार आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी एक वाजेपर्यंत देशात 39.92 टक्के मतदान; महाराष्ट्रात 31.55 टक्के मतदानाची नोंद

Video: दत्ता भरणे यांच्याकडून गावकऱ्यांना शिवीगाळ? सुप्रिया सुळे यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार

Uber Fake Fare Scam : चालक दाखवतायत खोटं भाडं, ग्राहकांची होतेय लूट.. उबरने दिला सावधान राहण्याचा इशारा!

Latest Marathi News Live Update: ''ही माझी शेवटची निवडणूक आहे'', काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांचे वक्तव्य

MI Playoffs Chances : बुडत्या मुंबईचं थालाच्या चेन्नईकडे लक्ष! MI फॅन्स निराश होऊ नका... अजूनही होता येईल क्वालिफाय?

SCROLL FOR NEXT