Nandurbar News : आदिवासी उपयोजना क्षेत्रातील नंदुरबार, नवापूर, शहादा, तळोदा, अक्कलकुवा व धडगाव येथे आधारभूत खरेदी योजनेंतर्गत भरडधान्य (मका) खरेदीसाठी शेतकऱ्यांनी (कास्तकार) १५ जून २०२३ पर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ, नंदुरबारचे व्यवस्थापक तुषार वाघ यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे. (Farmers urged to register till June 15 for purchase of maize nandurbar news)
शासकीय आधारभूत खरेदी योजनेंतर्गत मक्यासाठी एक हजार ९६२ दर निश्चित केला आहे. खरेदी केंद्र व खरेदी केंद्राचे प्रमुखाचे नाव व संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे आहे.
नंदुरबार तालुक्यात धानोरा व लोणखेडा व्ही. बी. पाडवी (मो. ९६८९६५०८९३ ), टोकरतळे एन. बी. वळवी, (९७३०८०४६७२), वावद एस. ए. पावरा (९४०४५७७२९३), नवापूर तालुक्यात नवापूर कोठडा, विसरवाडी, खांडबारा एम. आर. गिरासे (९४०३९४०९७६), शहादा तालुक्यात मंदाणा एन. बी. जमादार (९६७३३०२२७९),
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
तळोदा तालुका प्रतापपूर (संस्थेचे) एन. बी. पावरा (८८०५५९२४३९), शिर्वे एम. डी. सोनवणे (९४०३६०८६९४), अक्कलकुवा (ता. खापर) एन. बी. पावरा (९४२००५७३५४), मोलगीसाठी जी. डी. पावरा (८२६१८६५७९३) तसेच धडगाव तालुक्यातील धडगावसाठी जी. डी. पावरा (८२६१८६५७९३) असे आहेत.
वरील भागातील शेतकरी/कास्तकारांनी आपले भरडधान्य ज्वारी व मका खरेदी केंद्रावर नोंदणीसाठी वर्ष २०२२-२०२३ मधील रब्बी पीकपेरा असलेला सातबारा उतारा, आधारकार्ड, बँक पासबुकच्या छायाप्रतीसह नोंदणीसाठी स्वत: उपस्थित राहावे, असे श्री. वाघ यांनी कळविले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.