उत्तर महाराष्ट्र

सेंद्रिय पालकच्‍या शेतीतून विक्रमी उत्‍पादन 

जगन्नाथ पाटील


कापडणे : येथील शेतकरी भाजीपाला उत्पादन घेण्यात माहीर आहेत. कमी क्षेत्रात ते अधिक उत्पादन घेतात. येथील ज्ञानेश्वर खलाणे या अल्पभूधारक शेतकऱ्याने पालकची शेती स्वतःचे उदरनिर्वाहाचे साधन म्‍हणून बनविले आहे. पत्नी आणि मुले यांच्या सहकार्याने पालकचे विक्रमी उत्पादन घेत आहेत. सध्या त्यांनी फुलविलेल्या सेंद्रिय पालकला बाजारात मोठी मागणी आहे. 


धुळे बाजारात त्यांच्या भाजीपाल्याची वाट बघितली जाते. ज्ञानेश्वर खलाणे, उमाकांत खलाणे व गोविंद खलाणे हे तिन्ही बंधू व त्यांच्या पत्नी व मुले भाजीपाला उत्पादनात गुंतले आहेत. दिवसरात्र मेहनतीतून ते विक्रमी उत्पादन घेतात. धुळे व कापडणेच्या बाजारात स्वतः विक्री करतात. अधिकचा भाजीपाला शहादा व सुरतच्या बाजारात पाठवितात. भाजीपाला उत्पादनातून आर्थिक परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. सध्या बाजारात दहा ते बारा रुपये किलोप्रमाणे पालकाच्‍या भाजीला मागणी आहे. एकरी पन्नास ते साठ हजार उत्‍पन्न शेतकऱ्याला एका सीझनमध्ये (म्‍हणजे दोन महिन्यात) मिळते. त्‍यामुळे शेतही लवकर खाली होऊन दुबार पीक घेता येते. 


पालकची शेती परवडणारी आहे. मात्र पूर्ण परिवार शेतीत राबतो, म्हणून दोन पैसे दिसतात. भाजीपाला उत्पादन घेणे हा सुरवातीला छंद जडला होता. आता व्यावसायिक उत्पादक झाल्याने उत्पादनात वाढ झाली आहे. शेतकऱ्या‍ने भाजीपाला पिकवून स्वतः बाजारात विक्री केल्यास तो अधिक परवडतो. 
- ज्ञानेश्वर खलाणे, भाजीपाला उत्पादक शेतकरी, कापडणे 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT