मंदाणे : पंधरा एकर ऊस जळाला; आठ लाखांचे नुकसान sakal
उत्तर महाराष्ट्र

मंदाणे : पंधरा एकर ऊस जळाला; आठ लाखांचे नुकसान

मंदाणे शिवारातील घटना

सकाळ वृत्तसेवा

मंदाणे : मंदाणे शिवारात गुरुवारी (ता. ११) सकाळी अकराच्या सुमारास १५ एकर क्षेत्रात लागवड केलेल्या उसाच्या शेताला आग लागली. या आगीत सुमारे आठ लाखांचे नुकसान झाले. सायंकाळी उशिरापर्यंत शहादा, पानसेमल येथील अग्निशमन दल व ग्रामस्थांच्या मदतीने आग विझविण्यात यश आले. मात्र, वारा वाहत असल्याने आगीत संपूर्ण ऊस खाक झाला. शुक्रवारी (ता. १२) सकाळी पंचनामा करण्यात आला.

वडगाव रस्त्यालगत सर्व्हे क्रमांक ४२ मध्ये गुलाबराव मोरे व शहादा बाजार समितीचे संचालक किशोर मोरे यांनी १५ एकर क्षेत्रात उसाची लागवड केली होती. काही दिवसांनी ऊसतोडणीचे नियोजन केले जात असताना, गुरुवारी (ता. ११) सकाळी अकराच्या सुमारास उसाच्या शेताला आग लागल्याचे वृत्त गावात येऊन धडकले.

ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. मिळेल त्या साधनाने आग विझविण्यासाठी मदत केली. शेतमालकही घटनास्थळी पोचले. वाराही वाहत असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले. पानसेमल व शहादा येथील पालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. उसाला नुकतेच पाणी सोडले होते. त्यामुळे बंब शेतात नेण्यासाठी खूपच कसरत करावी लागली. सायंकाळी उशिरापर्यंत आग विझविण्यात यश आले. तोपर्यंत मोठ्या प्रमाणात ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला होता.

मंडलाधिकारी सुनील खैरनार व तलाठी एच. पी. धनगर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व नुकसानीचा पंचनामा करून तहसील कार्यालयात अहवाल सादर केला. दरम्यान, आगीचे कारण समजू शकले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG ODI: रोहित शर्मा, हार्दिक पांड्या OUT; दोन खेळाडूंचे पदार्पण! वन डे मालिकेसाठी टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

MRP Law Reforms: जंतर-मंतर येथे २५ मे रोजी एमआरपी कायद्यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने सत्याग्रह आंदोलन

Cockroach Janata Party : ‘कॉक्रोच जनता पार्टी’ला कोणाचं फंडिंग? राजकीय वाटचाल कशी असणार, अभिजीत दिपकेंनी सगळचं सांगितलं; "मी तर अमेरिकेत"

Jalna Crime: राजेश कोरकणे हत्येप्रकरणी ग्रामस्थांचा संताप: मोक्का लावा, फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवा, कठोर कारवाईची मागणी

Latest Marathi News Live Update : नागपूरमध्ये सिग्नलवर ग्रीन नेट आणि पाण्याचा फवारा

SCROLL FOR NEXT