Police team searching for weapons, bullets in piste after gang war between youths on Gondur Road. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : तरुणांमधील वादात गोळीबार; एकजण गंभीर

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : शहरातील देवपूरमधील बडगुजर कॉलनीत गरबाच्या कार्यक्रमात तरुणांच्या दोन गटांत वाद झाले. नंतर ते गोंदूर रोडवरील शनिमंदिराजवळ आले. त्यात त्यांनी बुधवारी (ता. १८) एकमेकांचा वचपा काढण्याचा प्रयत्न केला.

असे असताना टोळीतील १२ ते १३ तरुणांनी विरोधी गटातील तरुणांवर चॉपरने वार केला. तसेच दोघांनी कंबरेला असलेले पिस्टल काढत थेट गोळीबार केला. (Firing in dispute between youths dhule crime news)

जखमी तरुणाने नेम चुकविल्याने अनर्थ टळला. या प्रकरणी देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. संशयितांच्या अटकेसाठी पोलिस पथके रवाना झाली. अरविंद नंदुलाल बैसाणे (रा. इंदिरानगर, राजूदादा मोहिते चौक, स्टेडियमजवळ, धुळे) असे जखमी तरुणाचे नाव आहे.

दोन्ही टोळ्यांमधील तरुण सहा ते सात महिन्यांपासून एकमेकांशी बोलत नसल्याने व किरकोळ वादातून हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे.घटनास्थळी अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, उपअधीक्षक सचिन हिरे, एलसीबीचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, देवपूरचे पोलिस निरीक्षक सतीश घोटेकर यांनी घटनास्थळी भेट दिली. गुरुवारी सकाळी फॉरेन्सिक व श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले.

याबाबत अरविंद बैसाणे याचा भाऊ महेश ऊर्फ बाळा बैसाणे याच्या फिर्यादीनुसार जखमी अरविंद, त्याचा भाऊ बाळा व मित्र सचिन ठाकरे, यशोरत्न वाघ, चेतन सोनार, रोशन खैरनार, अनिकेत यांच्यासह बुधवारी रात्री साडेनऊ ते साडेदहादरम्यान बडगुजर कॉलनीतील गरबा मंडळाच्या ठिकाणी गेले. तेव्हा तेथे मित भामरे (रा. गौतमनगर, गोंदूर रोड, धुळे), दादू कपूर (रा. एकतानगर, बिलाडी रोड, देवपूर), प्रशीक वाघ (रा. वाडीभोकर, धुळे) व त्यांचे अन्य ८ ते १० मित्र तेथे आले.

बाळा व त्याचा भाऊ अरविंद तसेच त्यांचे मित्र गेल्या सहा-सात महिन्यांपासून दुसऱ्या गटाशी बोलत नसल्याने व किरकोळ वाद असल्याने गरबा पाहताना संशयित भामरे, कपूर व साथीदारांनी बाळा व अरविंद याला खुन्नस दिली. नंतर त्यांना दत्तमंदिर चौकात हिंमत असेल तर या, असे आव्हान दिले.

रात्री दहानंतर गोंदूर रोडवरील मंदिराजवळ बाळा, अरविंद यास भांडण मिटवायचे असल्याने चर्चेसाठी या, असा निरोप संशयित भामरे व साथीदारांनी दिला. त्याप्रमाणे ते दोघे घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा अरविंद यास कानाखाली मारत आणि प्रशीकने अरविंद याला पाठीमागून धरत भामरे याने त्याच्याजवळील चॉपरने डाव्या बाजूला पोटाच्या खाली कंबरेवर वार केल्याने अरविंद गंभीर जखमी झाला. त्याला ठार करण्याचा प्रयत्न केला.

तसेच मित व दादू याने पिस्टल काढत गोळीबार केला. मात्र, बाळा बैसाणे याने नेम चुकविल्याने अनर्थ टळला. तसेच महेश याचा मित्र चेतन सोनार याला मारहाण केली. हल्ल्यात अरविंद गंभीर जखमी झाल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी संशयित मित भामरे, दादू कपूर, प्रशीक वाघ यांच्यासह आठ ते दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT