Five bike thefts within a week from the district 
उत्तर महाराष्ट्र

जिल्ह्यातून आठवडाभरात पाच दुचाकीची लांबविल्या 

सकाळ वृत्तसेवा

नंदुरबार: जिल्ह्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ वाढला असून आठ दिवसात पाच जणांच्या दुचाकी लंपास करण्यात आल्या आहे. याबाबत संबंधित पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. बामखेडा (ता. शहादा) येथील मनोहर पटेल यांच्या घरासमोरून १५ हजार रुपये किमतीची होन्डा शाईन कंपनीची दुचाकी अज्ञात चोरट्याने पाच डिसेंबरला रात्री दहा ते पहाटे दोनचा दरम्यान लंपास केली. श्री. पटेल यांनी दुचाकीचा शोध घेतला. मात्र आढळून न आल्याने सारंगखेडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आली आहे. 

तसेच तळोदा येथील देशपांडे फोटो स्टुडिओच्या समोरुन अश्विनभाई मथुसुदन यांची २० हजार रुपये किमतीची हिरोहोडा फॅशन प्रो कंपनीची दुचाकी तीन जानेवारीला सायंकाळी सात ते आठच्या दरम्यान लंपास केली. श्री. मथूसुदन यांनी दुचाकीचा तपास केला असता आढळून न आल्याने तळोदा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. 

तिखोरा (ता. शहादा) येथे मनोज पाटील यांची २५ हजार रुपये किमतीची होंडा शाईन कंपनीची काळ्या रंगाची दुचाकी २८ डिसेंबरला सकाळी साडे पाचच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने लंपास केली. श्री. पाटील यांनी मोटरसायकलीचा शोध घेतला, मात्र आढळून न आल्याने शहादा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. नवापूर येथे रमेश गावित यांची २२ हजार रुपये किमतीची होंडा कंपनीची मोटरसायकल अज्ञात चोरट्याने दोन जानेवारीला सकाळी साडे आठच्या दरम्यान लंपास केली. श्री. गावित यांनी परिसरात दुचाकीचा शोध घेतला. मात्र आढळून न आल्याने नवापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. जुनवणे (ता. शहादा) येथील भाईदास पाटील यांची २५ हजार रुपये किमतीची होंडा कंपनीची मरुन रंगाची दुचाकी अज्ञात चोरट्याने चार जानेवारीला सहाच्या दरम्यान लंपास केली. याबाबत शहादा पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT