Flyover work in progress near Navrang Kothda Railway Gate.
Flyover work in progress near Navrang Kothda Railway Gate.  esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Traffic Problem : वाहतूक कोंडीची समस्या नित्याचीच; वाहनधारकांची डोकेदुखी

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : मार्च महिना पूर्ण होऊन एप्रिल अखेर आला आहे तरी नवापूर रेल्वे क्रॉसिंग च्या उड्डाणपुलाचे कामकाज अजून पूर्ण होऊ शकले नाही तर चिंचपाडा रेल्वे उड्डाणपुलाचे कामाबाबत विचार न केलेला बरा. (four lane work of National Highway No 6 has been going on for last 6 years nandurbar news)

ज्या संथगतीने कामकाज सुरु आहे त्यावरून तरी अजून सहा महिने नागरिकांना वाट पाहावी लागणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी सुटणार नसल्याचे चित्र आहे.

नवापूर कोठडा रेल्वे फाटकाजवळ येत्या दोन महिन्यात उड्डाणपूल तयार होईल तर चिंचपाडा रेल्वे क्रॉसिंगच्या ठिकाणी जूनपर्यंत उड्डाणपुलाचे काम होईल असे संबंधित विभागाने सांगितले होते. परंतु मार्च उलटल्यानंतरही कामकाज पूर्ण झालेले नाही. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाचे चौपदरीकरणाचे कामकाज गेल्या सहा वर्षांपासून सुरू आहे.

एवढा कालावधी कुठल्याही महामार्गाच्या विस्तारीकरणाला लागला नाही. कोरोना काळ सोडला तरी बराच कालावधी झाला आहे. सुरवातीला ज्या ठेकेदाराला काम डिके त्याने काही तांत्रिक कारणास्तव महामार्गाचे अर्धवट काम सोडून दिले आता म्हात्रे कंपनी काम करीत आहे. नवापूरचे बेडकी ते फागणे या रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम खूपच संथ गतीने सुरू आहे. या महामार्गाची निविदा प्रक्रिया पासूनच अडथळे येत आहेत.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

सदर महामार्ग गावातून की गावाबाहेरून यावरून दोन वेळा निविदा काढण्यात आली. शहरातून जाणाऱ्या महामार्गावर कुठे बोगदे असावेत आणि कुठे असू नये याबाबत ही आंदोलन झाली. वाहनधारकांना अजून किती दिवस वाहतूक कोंडीची समस्या सहन करावी लागणार हे अजून अस्पष्ट आहे.

महामार्गाचे चौपदरीकरण म्हणजे नुसती डोकेदुखी ठरली आहे. नवापूर कोठडा व चिंचपाडा रेल्वे फाटक जवळ फाटक खूप वेळ बंद असल्याने बराच वेळ वाया जातो. या दोन्ही रेल्वे क्रॉसिंगला उड्डाणपूल लवकरात लवकर होणे गरजेचे आहे.

दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

नवापूर व चिंचपाडा रेल्वे फाटक बंद झाल्यावर दोन्ही बाजूला एक ते दोन किलोमीटर च्या रांगा लागतात. रेल्वेफाटक पर्यंत एकेरी रस्ता असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. या जागेवर किमान पंधरा मिनिटे ते अर्धातास वेळ वाया जातो. ही समस्या नित्याची झाली आहे. उड्डाणपुलाचे काम युद्ध पातळीवर व्हावे अशी अपेक्षा आता नागरिकांची आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

IPL 2024 RCB vs CSK Live Score: विराटच्या सुरुवातीच्या तुफानानंतर बेंगळुरूत पावसाचं आगमन, सामना थांबला

Virat Kohli RCB vs CSK : मी एप्रिलमध्येच बॅग पॅक केली होती.... विराटला स्वतःच्या संघावर विश्वास नव्हता?

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, सहा महिन्यात POK भारताचा भाग होईल; योगींची मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update : पुणे-मुंबई हायवेवर वाहतूक कोंडी, वाहतूक संथ गतीने

SCROLL FOR NEXT