concre  sakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : धुळ्यात महत्त्वाचा रस्ता महिनाभर वाहतुकीस बंद

सकाळ वृत्तसेवा

धुळे : शहरातील लहापुलालगत सावरकर पुतळा ते अंडाकृती बगिचापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे हा रस्ता शनिवारी सकाळपासून (ता. ११) ते दहा मार्चपर्यंत बंद करण्यात येणार आहे. (From Savarkar statue along A bridge to oval garden road closed from Saturday morning to March 10 dhule news)

त्यामुळे या मार्गावरील वाहतूक महिनाभर बंद राहील, असे जिल्हा पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी आदेशान्वये कळविले आहे.

या पार्श्वभूमीवर एसटी बसेसह सर्वच वाहनांच्या मार्गात बदल करण्यात येत आहेत. शिरपूरकडे जाणारी मोठी वाहने लहान पुलालगत सावरकर पुतळ्यापासून पांझरा नदीकिनारी झालेल्या रस्त्याने हत्ती डोहाकडे, तेथून एसएसव्हीपीएस कॉलेज मार्गे जातील.

धुळे शहरात येणारी वाहने ही देवपूरमधील दत्तमंदिर चौक, जिल्हा क्रीडा संकुलमार्गे वाडीभोकर रोड, जयहिंद सिनिअर कॉलेज, पांझरा नदीवरील फरशीपूल, श्री कालिकामाता मंदिर ते गणपती पूलमार्गे शहरात येतील.

तसेच लहान वाहने वीर सावरकर पुतळ्यापासून आंबेडकर विधी महाविद्यालयामार्गे, मोचीवाडा, वाडीभोकर रोडमार्गे नेहरू चौक येथून ये- जा करतील. या मार्गावरुन येणाऱ्या व जाणाऱ्या सर्व वाहनधारकांनी तसेच, एसटी चालकांनी सूचित पर्यायी मार्गाचा वापर करावा. प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन श्री. बारकुंड यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shashikant Shinde: पोलिसांविरोधात आमदार शशिकांत शिंदे आक्रमक; कोरेगावात मोर्चा; बैठकीबाबतचे पत्र दोन दिवसांत द्यावे, नेमंक काय प्रकरण..

Devendra Fadnavis : कुंभमेळ्याच्या तयारीला वेग! ७ नोव्हेंबरला मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ७ हजार कोटींच्या कामांचे भूमिपूजन

Latest Marathi News Live Update : कुडाळ मालवण रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याच्या निषेधार्थ बैलगाडी आंदोलन

Video: 'फक्त ७ तास...' टीम इंडियाच्या खऱ्या कबीर खानचा फायनलआधी स्पेशल मेसेज अन् विश्वविजयानंतर रोहितप्रमाणे मैदानात रोवला तिरंगा

Cancer Love Horoscope: कर्क राशीच्या प्रेम जीवनात आज काय खास घडणार? वाचा तुमचं राशिभविष्य

SCROLL FOR NEXT