Crime News esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : गांजा वाहतूक करणाऱ्यास दुचाकीसह पकडले

सकाळ वृत्तसेवा

सोनगीर : मुंबई-आग्रा महामार्गावर सोनगीर फाट्याजवळ येथील पोलिसांनी संशयावरून मोटारसायकलस्वाराला हटकले असता त्याच्याकडे सुमारे एक लाख रुपयांच्या गांजा व मोटारसायकलीसह एक लाख ८७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही घटना रविवारी (ता. २९) सकाळी आठच्या सुमारास घडली. या प्रकरणी मोटारसायकलस्वारास अटक करण्यात आली. (Ganja transporter caught with two wheeler Dhule Crime News)

हेही वाचा : ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

शिरपूरकडून धुळ्याकडे जाणाऱ्या मोटारसायकल (एमएच १८, डीबी ९६४७)ला येथील पोलिसांच्या गस्तिपथकाने थांबविले. त्याच्याकडे पांढऱ्या गोणीत सुमारे एक लाख सात हजार दोनशे रुपये किमतीचा १३ किलो ४०० ग्रॅम गांजा आढळून आला.

संशयित मोटारसायकलस्वार फिरोज अली शाकीरअली (रा. कबीरगंज, धुळे) याला पोलिसांनी अटक केली असून, मोटारसायकल जप्त करण्यात आली. उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप मैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश फड तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: १९९४ चा जीआर नेमका काय आहे? मराठा समाज आरक्षणाबाहेर राहिला, कारण...

Pachod News : चौकशीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या धमकीने घाबरलेल्या शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन संपविले जीवन

Latest Marathi News Updates: भाजपमध्ये घराणेशाही नाही- देवेंद्र फडणवीस

कोकणातलं तुम्हाला काय आवडलं? दिलीप प्रभावळकर म्हणाले, 'ते पाहून मीच चकीत झालो कारण...

BCCI ची अब्जावधींची कमाई होते तरी कशी? भारताच्या तुलनेत पाकिस्तान क्रिकेट बोर्ड किती कमावतो पैसा, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT