Assistant Inspector Jayesh Khalane and associates with seized ganja. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : लाकड्या हनुमान येथे साडेचार लाखांचा गांजा जप्त

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : लाकड्या हनुमान (ता. शिरपूर) येथील शेतात लागवड केलेली १०८ किलो वजनाची गांजाची झाडे सांगवी पोलिसांनी जप्त केली.

संशयित मात्र घटनास्थळावरून फरारी झाला.( Ganja worth four and half lakhs seized by police dhule crime news )

सांगवी पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक जयेश खलाणे यांना गांजाच्या लागवडीबाबत माहिती मिळाली होती. त्यांनी सहकारी पोलिस पथकासह शासकीय अधिकारी, वजनमापे धारक व इतर आवश्यक अधिकाऱ्यांना सोबत घेऊन लाकड्या हनुमान येथील गांजाच्या शेतीवर छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागल्याने संशयित शेतमालक रायसिंह पावरा (रा. लाकड्या हनुमान) पळून गेला.

पोलिसांनी शेताची पाहणी केल्यावर पाच ते सहा फूट उंच वाढलेली गांजा वनस्पती आढळली. पोलिसांनी झाडे उपटून काढली. त्यांचे वजन सुमारे १०८ किलो असून किंमत चार लाख ३२ हजार रुपये आहे. संशयित रायसिंह पावरा याच्याविरोधात सांगवी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक जयेश खलाणे, उपनिरीक्षक संदीप पाटील, उपनिरीक्षक मंगला पवार, हवालदार सागर ठाकूर, प्रकाश भिल, सुनील पवार, मुकेश पावरा, दिनकर पवार, शिवाजी वसावे, अल्ताफ मिर्झा, मनोज पाटील यांनी ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांसाठी मोठी खुशखबर! विमानतळावरून १५ नवीन विमानांची उड्डाणे; कुठे आणि कधीपासून? जाणून घ्या...

Vaibhav Sooryavanshi ला भारतीय संघात पदार्पणाची संधी द्यायला हवी का? ऑस्ट्रेलियन दिग्गज म्हणतो, अरे त्या पोराला खेळू द्या...

Pune Crime : सासरच्या छळाला कंटाळून महिलेने संपविले जीवन; सासरे व दिराविरुद्ध गुन्हा दाखल

Pune Water Supply News : शहरातील पाणीपुरवठा गुरुवारी सुरळीत राहणार

RCB vs LSG: भुवनेश्वर-रसिकची जोडी भारी! लखनौचा फलंदाजी क्रम पूर्णपणे ढासळला, आरसीबीला किती धावांचं आव्हान?

SCROLL FOR NEXT