Police officers and team present during the action against the suspect along with Gavathi Kattya. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : देशी गावठी कट्टा बाळगणारा जेरबंद; 5 रिकामी काडतुसे जप्त

सकाळ वृत्तसेवा

धुळे : दहशत माजविण्याच्या उद्देशाने बेकायदेशीररीत्या देशी गावठी कट्टा बाळगणाऱ्या‍ संशयिताला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सोमवारी (ता. ३) जेरबंद केले. त्याच्याकडून २५ हजारांची सहा राउंडचे एक गावठी पिस्तूल आणि हजार रुपयांची पाच रिकामी काडतुसे जप्त केली. (gavathi katta holder jailed 5 empty cartridges seized Dhule Crime News)

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना सोमवारी प्राप्त माहितीवरून धमाणे (ता. धुळे) चौफुलीवर पाण्याच्या प्लांटमागे ट्रॅक्टरचालक भरत कैलास पावरा (वय ३०) या संशयितास ताब्यात घेतले.

दहशत माजविण्याच्या हेतूने तो बाळगून असलेले देशी गावठी पिस्तूल व पाच पितळी धातूची रिकामी काडतुसे बेकायदेशीररीत्या आढळले. त्याच्याकडून अग्निशस्त्र व रिकामी काडतुसे जप्त केली. किशोर ताराचंद पाटील यांच्या तक्रारीनुसार भरत पावरा याच्याविरुद्ध पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, प्रकाश पाटील, संजय पाटील, संदीप पाटील, पंकज खैरमोडे, महेंद्र सपकाळ, किशोर पाटील, योगेश जगताप यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 2nd Test: भारताला विजयाची संधी, पण पाऊस थांबणार कधी? शेवटच्या दिवशी खेळ झाला नाही तर काय, जाणून घ्या

'पुन्हा तोच बसस्टॉप' तेजश्री दिसणार जुन्या स्टॉपवर, फोटो शेअर करत म्हणाली, 'तेच ठाणे, तेच ठिकाण आणि तेच तुम्ही..'

Manmad News : मनमाड बाजार समितीच्या अडचणींवर मुख्यमंत्री फडणवीसांचा ‘सर्जिकल स्ट्राइक

Crime: मुंबईत धक्कादायक प्रकार! आधी गळा दाबून मारलं, नंतर ग्रॅनाइट मशीनने पत्नीचा शिरच्छेद अन्...; विक्षिप्त पतीचं कृत्य

'मला मराठी येत नाही, हिंमत असेल तर हकलून दाखवा' प्रसिद्ध अभिनेत्याचं ठाकरे बंधूंना चॅलेंज, म्हणाला, 'भाषेच्या नावावर हिंसा...'

SCROLL FOR NEXT