copper brass.jpg
copper brass.jpg 
उत्तर महाराष्ट्र

कलई व्यावसायिकांना 'अच्छे दिन'..

सकाळवृत्तसेवा

नाशिक : अडगळीत पडलेल्या तांबे-पितळी भांड्यांच्या स्वयंपाकघरातील वाढत्या वापरामुळे कलई व्यावसायिकांना "अच्छे दिन' आले आहेत. 25 वर्षांपूर्वी घरोघरी तांबे, पितळी व अ‍ॅल्युमिनिअमचे भांडे वापरली जात होती. दरम्यानच्या काळात स्वच्छता करण्यासाठी सोयीचे व आकर्षक डिझाइनमुळे घरोघरी स्टेनलेस स्टिलची भांडी मोठ्या प्रमाणावर वापरली जाऊ लागली. तांबे-पितळाची भांडी अडगळीत पडली, तर काहींनी मोड म्हणून विक्री केली. त्या मुळे कलई करणाऱ्या कारागिरांना इतर व्यवसाय करण्याची वेळ आली होती. 

तांबे-पितळी भांड्यांच्या वापरात वाढ...
तांब्या-पितळ्याच्या भांड्यांमध्ये पाणी साठवण्याची परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे. सध्या सोशल मीडियावर तांबे, पितळासह काश्‍याचे भांडे आरोग्यासाठी किती उपयुक्त आहेत. तसेच, अ‍ॅल्युमिनिअम सह इतर धातू व प्लॉस्टिकची भांड्यांच्या अधिक वापरामुळे होणारे आरोग्यावर परिणामाविषयी फिरणाऱ्या संदेशांमुळे पुन्हा         तांबे -पितळीच्या भांड्यांचा वापर वाढला आहे.

आरोग्याच्या दृष्टीनेही उपयोगी गुणधर्म...

तांब्याच्या भांड्यात २ ते ३ तास ठेऊन ते पिल्याने आम्लपित्त, मधुमेह, सांधेदुखी, मूत्राशय आदींच्या गंभीर विकारांवर गुणकारी ठरते. त्यामागे शास्त्रीय कारण आहे. ते म्हणजे तांब्या-पितळ्याच्या भांड्यांमध्ये साठवलेले पाणी हे त्या धातूंच्या नैसर्गिक जंतुनाशक गुणधर्मामुळे फक्त निर्जंतुकच होते असे नाही, तर आरोग्याच्या दृष्टीनेही अधिक उपयोगी गुणधर्म त्यात प्रविष्ट होतात. 

वैविध्यपूर्ण तांबे-पितळाची भांडी ठरताय आकर्षक  ...

अनेक महिला भांडी बाजारातून आकर्षक डिझाइनचे तांबे-पितळाची भांडी खरेदी करीत आहेत. त्यात ग्लास, वाटी, कलश, शोभेच्या मुर्ती, पाणी बॅाटल, फुलदाणी अशा विविध वस्तू महिलावर्गाचे लक्ष वेधतांना दिसून येत आहे.

कलईच्या दरात वाढ...

पुन्हा पितळी भांड्यांचा वापर वाढल्याने कलई करणाऱ्या कारागिरांना आपल्या हक्काच्या व्यवसायातून रोजगार मिळत आहे. मात्र, कलई करण्यासाठी लागणारे कथील धातूचे दर पाचशे ते सहाशे रुपये प्रतिशंभर ग्रॅम आहेत. कलईसाठी आवश्‍यक कोळसाचे दर वाढले आहेत. त्यामुळे कलईच्या दरात वाढ झाली आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raghuram Rajan: संपत्ती वितरणावर रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

AIMIM Chief Asaduddin Owaisi: 'मुस्लिम सर्वात जास्त वापरतात कंडोम....', AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी असे का म्हणाले?

Ban vs Ind 1st T20 : भारताची विजयाने सुरुवात! मायदेशात बांगलादेशने पत्करली शरणागती; टी-20 मालिकेत 1-0 आघाडी

Alien Life : पृथ्वीपेक्षा अडीच पट मोठ्या ग्रहावर एलियन्स असण्याचे संकेत; जेम्स वेब टेलिस्कोपच्या मदतीने घेणार शोध

Share Market Opening: शेअर बाजारात आठवड्याची जोरदार सुरुवात; सेन्सेक्स आणि निफ्टी तेजीत

SCROLL FOR NEXT