Shrikant Dhiware, Shashikant Patil while inspecting Navkar Goshala on Monday. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : अधीक्षक कार्यालयात ‘गोरक्षक सेल’; ‘एसपी’ श्रीकांत धिवरे यांचा निर्णय

गोरक्षकांसह पोलिसांमध्ये समन्वय वाढीसाठी जिल्हास्तरावर येथील पोलिस अधीक्षक कार्यालयात गोरक्षक सेल स्थापन करण्याचा निर्णय जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सोमवारी (ता. १२) घेतला.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : शहरासह जिल्ह्यात चौफेर चोरट्या व नियमित मार्गांवरून गोतस्करी सुरू असते. या संदर्भात दिवसाआड निरनिराळ्या पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल होत असतो. बऱ्याचदा गोरक्षक गोतस्करी रोखण्यासाठी पुढाकार घेताना दिसतात. त्यात वादाचे, त्यांच्यावर हल्ल्याचे प्रसंगही घडत असतात. त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होत असतो.

अशा घटनांना प्रतिबंध बसावा आणि गोरक्षकांसह पोलिसांमध्ये समन्वय वाढीसाठी जिल्हास्तरावर येथील पोलिस अधीक्षक कार्यालयात गोरक्षक सेल स्थापन करण्याचा निर्णय जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सोमवारी (ता. १२) घेतला. (Gorakshak cell in Superintendents office Decision of SP Shrikant Dhiware dhule news)

धुळे जिल्हा दोन राष्ट्रीय महामार्ग आणि चार राज्य महामार्गावर वसला आहे. जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात गोवंश जनावरांची वाहतूक होत असते. बऱ्याचदा गोरक्षकांकडून अशा वाहनांना अडविण्यात येत असते. त्यांच्यात होणाऱ्या वादातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होत असतो.

अशा प्रकारच्या घटनांना प्रतिबंध बसावा आणि गोरक्षक व पोलिसांमध्ये समन्वय वाढावा यासाठी जिल्हास्तरावर पोलिस अधीक्षक कार्यालयात ‘गोरक्षक सेल’ स्थापन करण्याचा निर्णय पोलिस अधीक्षक धिवरे यांनी घेतला.

सेलचे नियुक्त पथक

गोरक्षक सेलमध्ये काही अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाली आहे. त्यात एलसीबीचे पोलिस उपनिरीक्षक प्रकाश पाटील (मो. ९८२३८१३५९९), हवालदार रवींद्र माळी (९८२३८०३१५१), हवालदार संदीप पाटील (९९२३३७२७७५), वाचक शाखेचे हवालदार भीमराव बोरसे (७०८३९८१८६४)

पोलिस नाईक मनोज बागूल (९०४९७७१८०२) यांचा समावेश आहे. त्यांना नेमणूक ठिकाणचे दैनंदिन कामकाज सांभाळून गोरक्षक सेलचे कामकाज पाहावे, असे पोलिस अधीक्षकांचे निर्देश आहेत.

सेलवर जबाबदारी

गोरक्ष सेलच्या पथकाने सर्व पोलिस ठाण्यांशी समन्वय साधत गोवंश वाहतूक, मांस विक्री व प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यासंबंधात दाखल गुन्ह्यांचे पर्यवेक्षण करणे, माहिती अद्ययावत ठेवणे. अशा प्रकरणातील दाखल गुन्ह्यात आरोपींवर संबंधित पोलिस ठाण्याकडून प्रतिबंधक कारवाई करून घेणे, माहिती अद्ययावत ठेवणे.

गुन्ह्यांचा अभ्यास करून त्यातील आरोपींविरुद्ध मोक्का, ‘एमपीडीए’चे प्रस्ताव पोलिस ठाण्यांकडून तयार करणे व माहिती अद्ययावत ठेवणे. गुन्ह्यातील निष्पन्न, जप्त वाहनांचे रजिस्ट्रेशन रद्द करण्याची कारवाई संबंधित पोलिस ठाण्याकडून ‘आरटीओ’मार्फत करणे.

गोवंश वाहतूक, मांसविक्री आदींबाबत गोपनीय माहिती काढून संबंधित पोलिस ठाण्यास कारवाईसाठी कळविणे.

विविध गोरक्षक संघटनांशी योग्य समन्वय ठेवत कायदा व सुव्यस्थेचा प्रश्‍न निर्माण होणार नाही यासाठी संबंधित पोलिस ठाण्याकडून उचित कारवाई करून घेणे, एलसीबीच्या पोलिस निरीक्षकांनी गोरक्षक सेलच्या कामकाजाचे पर्यवेक्षण करणे आणि आवश्यकतेनुसार पोलिस अधीक्षकांना माहिती देणे, अशी जबाबदारी निश्‍चित करण्यात आली आहे.

घटनेचे निमित्त अन्‌ निर्णय

लळिंग टोलनाक्याजवळ सोमवारी सकाळी गोवंश जनावरांची तस्करी होत असल्याचे गोरक्षकांना कळाले. त्यांनी गोतस्करी रोखली. त्या वेळी मोहाडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक शशिकांत पाटील व पथकाने गुन्हा दाखल करत दोन संशयितांना अटक केली.

गोवंश जनावरांना नवकार गोशाळेत नेण्यात आले. तेथे पोलिस अधीक्षक धिवरे यांनी पाहणी केली. यानंतर गोरक्षक सेल स्थापण्याचा निर्णय अधीक्षकांनी घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गोव्याचे मंत्री रवी नाईक यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन, दोनवेळा भूषवलेलं मुख्यमंत्रीपद

Raju Shetti: शेतकऱ्यांना यंदा उच्चांकी दर मिळवून देणार: राजू शेट्टी; स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस दर निर्णायक बैठक, ऊसतोडीची गडबड करू नये

IPS अधिकाऱ्यावर अंत्यसंस्कार होण्याआधी त्यांच्यावरच आरोप करत ASIने स्वत:ला संपवलं; पोलीस दलात खळबळ

Gautam Gambhir: तुमच्या फायद्यासाठी खेळाडूला लक्ष्य करू नका; गौतम गंभीर, हर्षित राणावरून माजी कर्णधार श्रीकांत यांना सुनावले

Latest Marathi News Live Update : पुणे शहरात भाजपमध्ये होणार मोठं इन्कमिंग, मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत होणार सोहळा

SCROLL FOR NEXT