Women and Child Development  esakal
उत्तर महाराष्ट्र

संकटग्रस्त महिलांना मिळेल तात्काळ मदत

निखिल सुर्यवंशी

धुळे : महिला व बालविकास विभागामार्फत १६ ते ६० वर्षे वयोगटातील निराश्रित, परितक्त्या, कुमारी माता, लैंगिक अत्याचार अथवा संकटग्रस्त महिलांना आश्रय देऊन त्यांच्या पुनर्वसनासाठी शासकीय महिला राज्य गृहे स्थापन झाली आहेत. जिल्ह्यात शासकीय ममता महिला वसतिगृह कार्यरत आहे. त्याचा गरजू महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सचिन शिंदे यांनी केले.

वसतिगृहात प्रवेशासाठी महिलांना अधीक्षकांकडे अर्जाव्दारे प्रवेश घेता येईल. सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्था किंवा पोलिसांमार्फत वसतिगृहात दाखल होता येईल. या वसतिगृहांमध्ये महिलांना अन्न, वस्त्र व निवाऱ्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येते. आवश्यकतेनुसार वैद्यकीय सेवा, महिलांना व्यवसाय प्रशिक्षणाची सुविधा, अविवाहित किंवा घटस्फोटित महिलांच्या विवाहासाठी संस्थेमार्फत प्रयत्न केले जातात. शिवाय कायदेविषयक मदत व सल्ला देण्यात येतो. तसेच लाभधारक महिलेच्या समवेत सहा वर्षांआतील लहान मूल/मुले असल्यास त्यांनाही वसतिगृहात प्रवेश देण्यात येतो.

महिला वसतिगृहात ३० दिवसांपेक्षा अधिक काळ राहिल्यास तिला वरील सुविधा व्यतिरिक्त सुधारित माहेर योजनेंतर्गत दरमहा हजार रोख अनुदान देण्यात येते. या महिलेबरोबर लहान मुले असल्यास पहिल्या मुलासाठी पाचशे रुपये व दुसऱ्या मुलासाठी चारशे रुपये रोख अनुदान देण्यात येते. ते वर्षासाठी अनुज्ञेय आहे. जिल्ह्यात शासकीय ममता महिला वसतिगृह म्हणून ही संस्था प्लॉट क्रमांक ११, आदर्शनगर, इंदिरा गार्डनजवळ, देवपूर, धुळे येथे कार्यरत असून गरजू महिलांनी लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी अधीक्षक आर. व्ही. बिरारी, दूरध्वनी- ०२५६२- २२६९०६ यांच्याशी संपर्क साधावा. संकटग्रस्त महिलांच्या मदतीसाठी १९०१ हा टोल फ्री क्रमांक असल्याचे विभागाने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivaji Maharaj Video: शिवरायांनी अफजल खानाचा वध कसा केला? महाराजांचे भक्त असाल तर फक्त 7 मिनिटे वेळ काढा, थरारक AI व्हिडिओ व्हायरल

Pune Crime News : “मुळशीत पाय ठेवलास तर ‘मुळशी पॅटर्न’ करेन”; व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी

तू भाई अपना काम कर...! Steve Smith सोबत 'राड्या'चा किस्सा रोहित शर्माने मजेशीर अंदाजात सांगितला; ०.४९ सेकंदाचा भन्नाट Video

Credit Card : ₹3,000 पर्यंत कॅशबॅक; झिरो जॉइनिंग फी; UPI पेमेंट्सवरही फायदा! जाणून घ्या या नव्या क्रेडिट कार्डच्या खास ऑफर्स

Shani Dosha: शनि दोष कमी होईल; फक्त हनुमान मंदिरात गेल्यावर ही गोष्ट लक्षात ठेवा!

SCROLL FOR NEXT