Election of Gram Panchayat esakal
उत्तर महाराष्ट्र

Gram Panchayat Election : ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर; जिल्ह्यात 27 पोटनिवडणुक

सकाळ वृत्तसेवा

Gram Panchayat Election : जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती, नव्याने स्थापित व २०२२ मध्ये चुकीची प्रभागरचना झाल्यामुळे निवडणुका न होऊ शकलेल्या ग्रामपंचायतींच्या सदस्यपदासह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी संगणक प्रणालीद्वारे तसेच ग्रामपंचायतीतील रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी पारंपरिक पद्धतीने राबविण्याचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आल्याची माहिती उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये दिली. (Gram Panchayat Election Program Announced nandurbar news)

शहादा तालुक्यातील एकूण १६ व नंदुरबार जिल्ह्यातील २७ ग्रामपंचायतींचा पोटनिवडणुकीचा टप्पानिहाय कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे :

६ ऑक्टोबर निवडणूक नोटीस प्रसिद्ध करणे, १६ ते २० ऑक्टोबर सकाळी अकरा ते दुपारी तीनपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागविणे व सादर करणे, २३ ऑक्टोबर सकाळी अकरापासून नामनिर्देशनपत्र छाननी, २५ ऑक्टोबरला दुपारी तीनपर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेणे व दुपारी तीननंतर निवडणूक चिन्ह नेमून देणे .

अंतिमरीत्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे, ५ नोव्हेंबरला सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाचपर्यंत मतदान, ६ नोव्हेंबरला मतमोजणी व निकाल घोषित करणे, तसेच नक्षलग्रस्त व दुर्गम भागासाठी ७ नोव्हेंबरला मतमोजणी व निकाल घोषित करणे. ९ नोव्हेंबरला निवडणूक निकालाची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Toll Collection : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण, टोल वसुली सुरू; नितीन गडकरींच्या आवाहनाला केराची टोपली

लाईव्ह सामन्यात रवी शास्त्रींची मोठी चूक! नाणेफेकीच्या वेळी शुभमन गिलला काय बोलले?

Child Rescue Operation: पंजाबमध्ये कूपनलिकेतून नऊ तासांनंतर मुलगा बाहेर; घराबाहेर खेळताना पडला होता खड्ड्यात, होशियारपूरमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन!

Rajdhani Express धावत्या राजधानी एक्सप्रेसमध्ये आगीचा भडका, एसी कोच जळून खाक

Amravati : अतिक्रमणातील चहाटपऱ्या काढल्याचा राग, पठ्ठ्या सिलिंडर घेऊन थेट पाण्याच्या टाकीवर चढला अन ....

SCROLL FOR NEXT