Crime News esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : ग्रामपंचायत गैरव्यवहार प्रकरणी संशयित 2 वर्षांनी गजाआड

सकाळ वृत्तसेवा

पिंपळनेर : जेबापूर (ता. साक्री) येथील ग्रामपंचायतीतील तब्बल सव्वीस लाखांच्या गैरव्यवहारप्रकरणी दोन वर्षांपासून फरारी असलेले सरपंच व ग्रामसेवकांना अटक करण्यात पोलिसांना यश आले.

या दोघांनी ग्रामविकासाचा २६ लाख ३६ हजार ५० रुपयांचा निधी परस्पर काढून घेतला होता. (Gram Panchayat malpractice case Suspect jailed after 2 years Dhule News)

हेही वाचा : प्रेमाला धर्म आहे...?

जेबापूर (ता. साक्री) येथील ग्रामपंचायतीत १ एप्रिल २०१६ ते १७ जुलै २०१९ पर्यंत तत्कालीन सरपंच जगन्नाथ रामसिंग मालचे (रा. जेबापूर) व तत्कालीन ग्रामसेवक अनिल ऊर्फ बबल्या विश्वास सोनवणे यांनी संगनमताने १४ व्या वित्त आयोगामार्फत मंजूर झालेल्या रकमेतून १३ लाख ३३ हजार रुपये, पेसा निधीतून बारा लाख २७ हजार रुपये, ग्रामनिधीतून ५६ हजार ५५० रुपये, जैवविविधा निधीतून १९ हजार ५०० रुपये असा एकूण २६ लाख ३६ हजार ५० रूपये जनतेच्या फायद्यासाठी न वापरता दोघांनी युनियन बँकेच्या पिंपळनेर शाखेतून परस्पर काढून घेतले होते.

याप्रकरणी साक्री पंचायत समितीचे तत्कालिन विस्तार अधिकारी अमृत पंडित महाले यांनी १३ ऑगस्ट २०२० ला पिंपळनेर पोलिसांत फिर्याद दिली होती. तेव्हापासून ते दोघे आरोपी फरारी होते. त्यांचा पिंपळनेर पोलिस कसून शोध घेत होते.

शेवटी तब्बल दोन वर्षांनी पोलिसांनी त्यांना शोधून काढले. २२ डिसेंबर २०२२ ला त्यांना अटक करण्यात आली. त्यांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. उपनिरीक्षक प्रदीप सोनवणे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil : जयंत पाटील यांचा प्रदेशाध्यपदाचा राजीनामा? सुप्रिया सुळेंनी दिली महत्त्वाची माहिती

Ram Shinde: हरित क्रांतीचा नवा अध्याय : विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, १८७६ दुर्मिळ देशी वृक्षांची लागवड

Pune News: राज्यात धरणसाठा ६० टक्क्यांवर; पुणे विभागात मुबलक पाणी, जोरदार पावसाने काही भागांत पूरस्थिती

Kolhapur : कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी शासनाची पुढची स्टेप, पालकमंत्री आबिटकरांनी कायदेशीर त्रुटी दूर करण्यावर दिला भर

संतापजनक! आळंदीत वारकरी संस्थेत तरुणीवर बलात्कार, किर्तनकार महिलेसह कुटुंबातील ५ जणांवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT