Group development officer's vehicle burnt in the premises of Nandurbar Panchayat Samiti. esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : गटविकास अधिकाऱ्यांचे वाहन पेटविले? पंचायत समिती आवारातील घटना

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : येथील पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात उभ्या असलेल्या गटविकास अधिकाऱ्यांच्या वाहनाने रात्री अचानक पेट घेतल्याने वाहन खाक झाले. या वेळी तेथे उपस्थित कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्याने त्यांची एकच धावपळ उडाली होती.

जळीत वाहनालगत इतर दुसरे वाहने नसल्याने पुढील मोठा अनर्थ टळला. (gram panchayat vehicle of group development officers was set on fire nandurbar news)

दरम्यान, आवारात उभे असलेले वाहन पेटलेच कसे, याबाबत विविध प्रश्‍न उपस्थित होत आहेत. त्यामुळे याचे उत्तर आता सीसीटीव्हीच्या तपासणीतच मिळू शकेल.

नंदुरबार पंचायत समितीच्या आवारात गटविकास अधिकारी जयवंत उगले यांचे शासकीय वाहन (एमएच ३९, एबी ८७७३) शनिवार-रविवारी शासकीय सुटी असल्याने चालकाने उभे केले होते. रविवारी रात्री अचानक वाहनातून धूर व ज्वाला निघताना पंचायत समिती परिसरात खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या व्यावसायिकांच्या लक्षात आले.

त्यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे पंचायत समितीत रात्रीच्या ड्यूटीवरील कर्मचाऱ्यांनी गाडीच्या दिशेने धाव घेतली. तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. परिसरातील व्यावसायिकांनी तातडीने पोलिसांना आणि अग्निशमन बंबाला कळविले. तोपर्यंत उपस्थित नागरिकांनी मिळेल त्या साधानांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला.

घटनेची माहिती पंचायत समिती अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर त्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. आगीच्या ज्वाला मोठ्या होत्या. त्यामुळे लांबूनच ही आग दिसून येत होती. सुदैवाने कार्यालय परिसरातील इतर ठिकाणी ही आग पसरू शकली नाही.

आग विझल्यानंतर त्या ठिकाणी पाहणी करण्यात आली. तेथे पेट्रोलसदृश द्रव असलेली बाटली आढळून आली. शिवाय लगतच एक चप्पलदेखील दिसून आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे गाडीने पेट घेतला की पेटविण्यात आली? पेटवली असेल तर ती का पेटविण्यात आली? याबाबत चर्चेला उधाण आले आहे. दोन दिवसांपासून उभे असलेले वाहन अचानक पेट कसे घेणार, याबाबतही शंका उपस्थित होत आहे. याबाबत शहर पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.

आता सीसीटीव्हीवरच भिस्त

पंचायत समिती आवाराला दोन मोठे प्रवेशद्वारे आहेत. ती नेहमी बंद असतात, तर तेथे जाणाऱ्याने प्रवेश केला कसा, असाही प्रश्‍न उपस्थित होत आहे. त्यामुळे आवारात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेराच आता गुन्हेगारापर्यंत पोचविण्यास पोलिसांना मदत करेल. मात्र सीसीटीव्ही कॅमरे कार्यान्वित होते का, हा प्रश्‍न चर्चेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलने जिंकलं 'दिल'! ऐतिहासिक कामगिरी अन् इंग्लंडला न पेलवणारे लक्ष्य; भारताच्या १०००+ धावा

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

Aurangabad Murder Case : काकाच्या प्रेमात पडलेल्या महिलेने ४० लाख अन् प्लॉट हडपण्यासाठी काढला पतीचा काटा!

IND vs ENG 2nd Test: इंग्लंडच्या खेळाडूने रिषभ पंतला दाखवलं 'आमिष'; आपल्या पठ्ठ्याने काय उत्तर दिले पाहा, Viral Video

SCROLL FOR NEXT