Jalaj Sharma esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News: अल्पसंख्याक शाळांना सुविधांसाठी अनुदान! जिल्हाधिकारी शर्मा

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थीबहुल शासनमान्यताप्राप्त अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित खासगी अल्पसंख्याक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पालिका, नगर परिषद शाळा व दिव्यांग शाळांमध्ये पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अनुदान दिले जाते.

या अनुदानाच्या प्रस्तावासाठी १० ऑगस्ट २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा उच्चस्तरीय निवड समितीचे अध्यक्ष जलज शर्मा यांनी दिली. (Grants for facilities to minority schools Collector Sharma Dhule News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्याचे बहुल असलेल्या शासनमान्य शैक्षणिक संस्थांना पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देऊन शिक्षणाचा गुणात्मक दर्जा उंचावण्यासाठी पात्र शासनमान्य खासगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांना पायाभूत सोयी-सुविधा निर्माण करण्यासाठी वार्षिक दोन लाख रुपये एवढ्या रकमेच्या मर्यादेपर्यंत शासनाकडून अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

संस्थेकडून प्राप्त प्रस्तावांची छाननी करून शासनास अनुदानासाठी शिफारस करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमार्फत शासन निर्णयामध्ये विहित केलेल्या निकषांनुसार तपासणी करून पात्र प्रस्तावांची शिफारस शासनास करण्यात येईल.

२०२३-२४ या वर्षासाठी अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या शासनमान्य खासगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व दिव्यांग शाळा यांनी आपले प्रस्ताव जिल्हा नियोजन अधिकारी (जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे) यांच्याकडे १० ऑगस्ट २०२३ पर्यंत सादर करावे. त्यानंतर प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत असे जिल्हाधिकारी शर्मा यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सूर्यकुमारची विकेट घेणारा नाशिकचा रामकृष्ण घोष IPL 2026 स्पर्धेतून अचानक बाहेर; CSK ने केली मोठी घोषणा

IPL 2026, GT vs PBSK: वॉशिंग्टनची सुंदर फिनिश अन् गुजरातचा थरारक विजय; पंजाबचा सलग दुसरा पराभव; Points Table मध्ये काय झाले बदल?

IPL 2026 सुरू असतानाच बदलले राजस्थान रॉयल्सचे मालक! मित्तल अन् पुनावाला यांनी केली डिल, पण किती कोटी मोजले?

West Bengal Result: बंगाल निकालाचा 'महासंग्राम'! इतिहास घडणार की परंपरा कायम राहणार? हे ‘गेमचेंजर’ फॅक्टर्स निकाल ठरवणार

‘तुमचे पैसे पडले... म्हणत चार लाखांवर डल्ला! बँकेबाहेरच शेतकर्‍याची फसवणूक; 'एचडीएफसी'समोर दिवसाढवळ्या थरार...

SCROLL FOR NEXT