Superintendent of Police Shrikant Dhiware present during the inspection of the seized gutkha with the suspects in police custody Dattatreya Shinde, Police Squad. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : सोनगीरला 65 लाखांचा गुटखा जप्त; एलसीबी’ची कारवाई

मुंबई-आग्रा महामार्गावरून होणारी गुटख्याची तस्करी धुळे स्थानिक गुन्हे शाखेने रोखत सुमारे ६५ लाखांचा गुटखा जप्त केला.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : मुंबई-आग्रा महामार्गावरून होणारी गुटख्याची तस्करी धुळे स्थानिक गुन्हे शाखेने रोखत सुमारे ६५ लाखांचा गुटखा जप्त केला. सोनगीर (ता. धुळे) टोल नाक्यानजीक गुरुवारी (ता. २१) दुपारी साडेबारच्या सुमारास ही कारवाई केली.

कंटेनरसह ८५ लाखांचा मुद्देमाल जप्त करून चालकाला ताब्यात घेतले.(Gutkha worth 65 lakh seized from Songir by lcb dhule crime news)

राज्यात प्रतिबंधित गुटखा, पान मसाल्याची विक्रीच्या उद्देशाने मध्यप्रदेशातून तस्करी होत असल्याची माहिती पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना मिळाली. त्यानुसार ‘एलसीबी’चे पोलिस निरीक्षक दत्तात्रेय शिंदे यांना कारवाईचे आदेश दिले. माहितीची खातरजमा केल्यावर सोनगीर टोल नाक्याजवळील एका हॉटेलजवळ संशयित कंटनेर (एचआर ३८ ओसी ०४२२) उभा दिसला.

‘एलसीबी’ पथकाला चालकाने नरेशकुमार घनश्यामसिंग चौधरी (रा. मुरसाना, सहकारीनगर, जि. बुलंदशहर, उत्तर प्रदेश) असे नाव सांगितले. कंटनेरमधील मालाबाबत विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्यामुळे कंटेनर पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात आणले.

तपासणी केली असता त्यात राज्यात प्रतिबंधित गुटखा आढळला. ५६ लाख २५ हजार ९०० रुपयांचा शिखर पानमसाला, आठ लाख ८२ हजारांची एसएस-वन तंबाखू व २० लाखांचा कंटेनर, असा एकूण ८५ लाख सात हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. हा माल बंगळुरू (कर्नाटक) शहरात विक्रीसाठी नेला जात होता, अशी कबुली चालकाने दिली. पथकाने त्याला ताब्यात घेत सोनगीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलिस निरीक्षक दत्तात्रेय शिंदे, गणेश फड, श्याम निकम संजय पाटील, संदीप सरग, प्रकाश सोनार, हेमंत बोरसे, मच्छिंद्र पाटील, संतोष हिरे, संदीप पाटील, अशोक पाटील, प्रल्हाद वाघ, तुषार सूर्यवंशी, सुरेश भालेराव, राहुल गिरी, कमलेश सूर्यवंशी, जितेंद्र वाघ, जगदीश सूर्यवंशी, महेंद्र सपकाळ, गुणवंत पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT