Police team present with seized Gutkha stock.  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News: धुळ्यात सव्वादोन लाखांचा गुटखा जप्त; एलसीबी’ची कारवाई

चालकाने त्याचे नाव शाहरुख खान नसीरखान (रा. रौनकाबाद, मालेगाव) असे सांगितले. ट्रकची तपासणी केली असता त्यात प्रतिबंधित पानमसाला व तंबाखूचा साठा मिळून आला.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबई- आग्रा महामार्गावरून होणारी गुटख्याची तस्करी रोखत नगावबारी परिसरात सव्वादोन लाखांचा गुटखा व पाच लाखाचा ट्रक, असा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. (Gutkha worth two lakhs seized in Dhule crime news)

सोनगीरकडून धुळ्यामार्गे ट्रकमधून (एमएच ३१ सीआर ६२९६) राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची बेकायदेशीरपणे वाहतूक होत असल्याची माहिती ‘एलसीबी’चे पोलिस निरीक्षक दत्तात्रेय शिंदे यांना मिळाली.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने मुंबई-आग्रा महामार्गावरील शहरातील नगावबारी शिवारात सापळा रचून संशयित ट्रकला ताब्यात घेतले.

चालकाने त्याचे नाव शाहरुख खान नसीरखान (रा. रौनकाबाद, मालेगाव) असे सांगितले. ट्रकची तपासणी केली असता त्यात प्रतिबंधित पानमसाला व तंबाखूचा साठा मिळून आला.

कारवाईत ‘एलसीबी’ने ७७ हजार ७९२ रुपये किमतीच्या ८ गोण्या, १३ हजार ७२८ रुपयाच्या ८ गोण्या, २१ हजार ७८० रुपयाच्या ५ गोण्या, ९४ हजाराच्या १० गोण्या, ट्रक, असा एकूण ७ लाख १५ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : उत्तरप्रदेशात मराठी तरुणाला भोजपुरीत बोलण्यासाठी दमदाटी, भाषा येत नाही म्हटल्यावर....पाहा व्हिडीओ

Latest Maharashtra News Live Updates: नांदगावच्या दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान, ग्रामस्थ आनंदीत

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

SCROLL FOR NEXT