Ponds in colonies of shahada esakal
उत्तर महाराष्ट्र

नंदुरबार : जिल्ह्यात पावसाची हजेरी

कमलेश पटेल

नंदुरबार : दोन दिवसापासून ऊन सावल्यांचा सुरू असलेला खेळामुळे शेतकऱ्यांसह साऱ्यांनाच पाऊस (rain) येण्याची आशा होती. मात्र आकाशातील ढगांचा गडगडाट आणि इकडून तिकडे वाहणारे काळेभोर ढग यांनी नंदुरबार शहर व परिसरात केवळ आज सायंकाळी पावसाची शिरकावे पाडून हिरमोड केला. तर शहादासह तालुक्यात रविवारी (ता.१२) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सुमारे तासभर विजांच्या कडकटीसह (Lightning) जोरदार पाऊस (heavy rain) झाला. दरम्यान शहरातील नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. (heavy rains in nandurbar district Nandurbar News)

नंदुरबार शहरात गेल्या दोन दिवसापासून ऊन सावल्यांचा खेळ व त्यासोबतच होणारा उकाडा यामुळे सारेच हैराण झाले होते. विहिरी कूपनलिका आटल्याने शहरासह ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे साऱ्यांचेच डोळे आकाशाकडे लागले आहे. अशा स्थितीत सायंकाळी पाचच्या सुमारास आकाशात काळे ढग भरून आले. जोरदार पावसाची प्रतीक्षा नंदुरबारकरांना अजूनही कायम आहे.

शहाद्यात पावसाने नागरिकांची त्रेधातिरपीट

शहादा शहरासह तालुक्‍यातील पूर्व भागात आज सायंकाळच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. यात वाऱ्याचा वेग कमी असल्याने नुकसान झालेले नाही. सकाळपासून सर्वत्र वातावरणात उकाडा जाणवत होता. सायंकाळच्या सुमारास मेघगर्जनेसह जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने शहरात बाहेर खरेदीसाठी पडलेल्या नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. अर्धा जून होत आला तरी पाऊस नसल्याने सर्वत्र चिंता व्यक्त केली जात होती. परंतु मृग अंधारावर असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. बहुतांश शेतकऱ्यांनी बी-बियाणे आणून ठेवली आहे. मात्र पाऊस नसल्याने पेरणी लांबते की काय अशी चिंता होती. आणखी एका जोरदार पावसानंतरच शेतकरी पेरणीला सुरवात करतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Train Accident : भीषण रेल्वे दुर्घटना! मालगाडी अन् पॅसेंजर ट्रेन भिडल्या; अनेक प्रवाशांचा मृत्यू

२४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी २ डिसेंबरला मतदान! निवडणुकीचा कार्यक्रम कसा, आचारसंहितेचा नियम काय, अर्ज कसा करायचा, मतदारांना मोबाईल नेता येणार नाही

Kalyan News: कल्याण शीळ रोडवर २ दिवस वाहतुकीत बदल, 'असे' असतील पर्यायी मार्ग

Latest Marathi News Live Update : अजित पवार गटाची उत्तर महाराष्ट्रमधील पदाधिकाऱ्यांसोबत बैठक

Winter Birds: थंडीची चाहूल लागताच पाहुणे पक्ष्यांचे आगमन; जाणून घ्या सोलापूरमध्ये कुठे आणि कसे पाहाल पक्षीवैभव!

SCROLL FOR NEXT