Helm Seized by police in Shirpur
Helm Seized by police in Shirpur 
उत्तर महाराष्ट्र

शिरपूर येथून तरुणाकडून गांजा जप्त

सकाळवृत्तसेवा

धुळे : शिरपूरकडून एका विनाक्रमांकाच्या मोपेड गाडीवर गांजाची वाहतूक केली जाणार असल्याची माहिती चाळीसगाव रोड पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक सारिका कोडापे यांना मिळाली. त्यावरून त्यांनी कारवाईसाठी पथकाला पाठविले होते. बुधवारी(ता.8) सायंकाळी साडेसातला एका मोपेडवर पोलिसांना संशय बळावला. त्याला हटकले असता पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तरूणाला ताब्यात घेतले. त्याच्या मोपेड वाहनावर ठेवलेले दोन प्लास्टिकच्या गोणपाटाची तपासणी केली असता याम मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणारे हिरवट पिवळसर रंगाचा अर्धवट सुकलेला पाने, बिया, काड्या असा उग्रवासाचा गांजा आढळून आला. त्यास पोलिसांनी अधिकची विचारणा केली असता त्याने कैलास गुलाब बेलदार (वय34 रा. कळमसरे ता.शिरपूर) असे स्वता:चे नाव सांगितले. पोलिसांनी मोपेड वाहनासह तरूणास ताब्यात घेतले. या गोणपाटामध्ये असलेल्या अंमली पदार्थाची पंचसमक्ष काटयावर वजन केले असता 16 किलो 984 ग्रॅम इतके भरले. बाजारभावानुसार सुमारे 65 हजार रूपये इतकी किमंतीचा गांजा व 80 हजार रूपये किमंतीची मोपेड वाहन असा एक लाख 50 हजार 900 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिस प्रेमराज पाटील यांनी चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून कैलास बेलदार याच्याविरूध्द पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक विश्‍वास पांढरे, अपर पोलिस अधीक्षक डॉ.राजू भुजबळ, शहर पोलिस उपअधीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव रोड पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक सारिका कोडापे, उपनिरीक्षक योगेश ढिकले, हवालदार प्रेमराज पाटील, सुशिल शेंडे, प्रविण जोशी,अजिज शेख, धर्मेंद्र पवार, यांनी कारवाई केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT