Death esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : भाडेकरूने मागितली खंडणी; घरमालकाची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : घर खाली करण्यासाठी भाडेकरू दांपत्याने पाच लाख रुपये खंडणीची मागणी केली, तर इतर तिघांनी भिशीचे पैसे हडप करून करून मानसिक त्रास देत अडचणीत आणून ठार करण्याची धमकी दिली.

या त्रासाला कंटाळून घरमालकाने अंगातील शर्टाच्या सहाय्याने हॉलेटलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. (Homeowner suicide due to tanant dhule crime news)

या प्रकरणी भाडेकरू दांपत्यासह आठ जणांविरुद्ध मोहाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन जणांना अटक केली.

याबाबत सुनीता योगीराज पाटील (वय ४०, रा. प्लॉट नंबर ४७, संजयभाऊनगर, मोहाडी उपनगर, धुळे) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार त्यांच्या घराचे खालील तीन रूम सचिन बापू थोरात व रूपाली सचिन थोरात यांना भाडेतत्त्वावर दिले होते. मात्र दोघांनीही मार्च २०२३ पासून घरभाडे दिले नाही.

यामुळे त्यांना घर रिकामे करण्यास सांगितले होते. तेव्हा त्यांनी घर रिकामे करून देण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केली. पैसे दिले नाहीत तर तुमच्यासह मुलांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करू, अशी धमकी दिली. तसेच ते सुनीता पाटील व त्यांचे पती योगीराज पाटील यांच्याशी वाद घालून त्यांना शिवीगाळ करत ठार करण्याची धमकी देत होते.

तर त्या दोघांना जेठ जयवंत पीतांबर पाटील, जेठाणी छाया जयवंत पाटील, पुतण्या हृषीकेश जयवंत पाटील यांनी मदत केली. घर खाली करायचे असेल तर त्यांना पैसे द्यावे लागतील व घर हे जेठ जयवंत पाटील यांच्या नावे करून द्यावे लागेल, अशी धमकी दिली.

याबरोबरच मोहाडी गावातील लताबाई हिरामण साळुंखे, तिची मुलगी शीतल कुणाल सूर्यवंशी (रा. फागणे) व तिची बहीण शोभा भरत बागूल यांनी भिशीच्या माध्यमातून फिर्यादी पाटील दांपत्याचे पैसे हडप करून फसवणूक करत, मानसिक त्रास देत घरमालक पाटील यांना आर्थिक अडचणीत आणले.

या त्रासामुळे व जाचाला कंटाळून अखेर योगीराज पाटील यांनी धुळे-चाळीसगाव रस्त्यावरील बंद असलेल्या हॉटेल संगीता येथे (हॉटेल नायडू दरबार) किचनमध्ये ओट्यालगत खिडकीला असलेल्या उभ्या लोखंडी गजाला अंगातील शर्टाच्या सहाय्याने गळफास घेतला. या प्रकरणी भाडेकरूंसह वरील आठ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी जयवंत पाटील व छाया जयवंत पाटील यांना अटक केली. पोलिस उपनिरीक्षक संदीप काळे तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT