Sachin More returning the jewelery bag to Kirti Sonar at Devpur Police Station. Neighbor Police Inspector Satish Ghotekar. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा; दागिन्यांची बॅग महिलेला सुपूर्द

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : महिलेची रिक्षात राहिलेली दागिन्यांची बॅग रिक्षाचालकाने प्रामाणिकपणा दाखवत देवपूर पोलिसांच्या माध्यमातून परत केली.

त्यामुळे रिक्षाचालकाचे कौतुक होत आहे.( honesty of rickshaw driver hands over bag of jewelry to woman dhule news )

कीर्ती वामन सोनार (चाळीसगाव, जि. जळगाव) या चौदा नोव्हेंबरला सकाळी साडेअकराच्या सुमारास रिक्षाने खानदेश कुलस्वामीनी श्री एकवीरादेवीची ओटी भरण्यासाठी शहरात आल्या. तेव्हा चुकून त्यांची बॅग रिक्षात राहिली. बॅगेत जवळपास चार तोळे सोन्याचे दागिने होते.

याबाबत कीर्ती सोनार यांनी देवपूर पोलिस ठाण्यास सविस्तर माहिती दिली. पोलिस निरीक्षक सतीश घोटेकर यांच्या सूचनेवरून गुन्हे शोधपथकाचे मिलिंद सोनवणे, पंकज चव्हाण, सौरभ कुटे, गुंजाळ यांनी घटनास्थळी पाहणी केली. तसेच परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. त्यावरून रिक्षाचालकाचा शोध लागला.

रिक्षा शहरातील रेल्वे स्टेशन भागातील असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार रिक्षाचालक सचिन श्रीराम मोरे (रा. रेल्वे स्टेशनजवळ, धुळे) यांच्याकडे बॅगेसंबंधी विचारणा केली असता श्री. मोरे यांनीही प्रामाणिकपणा दाखवून बॅग दागिन्यासह काढून दिली.

नंतर पोलिस निरीक्षक सतीश घोटेकर यांच्या उपस्थितीत कीर्ती सोनार यांना त्यांच्या किमती दागिन्यांची बँग सोपविण्यात आली. दागिने सुरक्षित असल्याने श्रीमती सोनार यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. तसेच पोलिसांचे सहकार्य आणि रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणाबद्दल आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT