Agriculture esakal
उत्तर महाराष्ट्र

कापूस लागवडीसाठी बागायतदार शेतकरी सज्ज पण...

शेतकरी कापूस लागवडीसाठी लगीनघाई करीत आहे. मात्र कृषी विभागाने एक जून नंतरच कापूस लागवडीचे फर्मान काढले आहे.

सकाळ वृत्तसेवा

कापडणे : गेल्या खरीप हंगामाच्या उत्तरार्ध सातत्यपूर्ण पाऊस झाला. नदीनाले डिसेंबरपर्यंत वाहिलेत. अद्यापही विहिरींची पाणी पातळी बऱ्यापैकी टिकून आहे. शेतकरी कापूस लागवडीसाठी लगीनघाई करीत आहे. मात्र कृषी विभागाने एक जून नंतरच कापूस लागवडीचे फर्मान काढले आहे. शेतकऱ्यांनी शेती मशागत करून लागवडीसाठी ठिबक अंथरूण तयारी पूर्ण केली आहे. दोन जूनपासून कापसाची लागवड करणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

ठिबक असूनही कापूस लागवड नाही

कमी पाण्यातही ठिबकने प्रती शेतकरी हेक्टर दोन हेक्टर कापसाची लागवड करून अधिक उत्पादन घेण्याचा प्रयत्न करीत असतो. यासाठी मे च्या उत्तरार्धाची लागवड फायदेशीर ठरत असते. यावर्षी कृषी विभागाने बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एक जून नंतरच लागवड करण्याचे फर्मान काढल्यानंतर कृषी विभागाची अंमलबजावणी करताना शेतकरी दिसत आहे. यावर्षी विहिरी व कूपनलिकांची पाणी पातळीही चांगली टिकून आहे. ठिबकने मोठे क्षेत्र लागवडीखाली येणार आहे. ठिबकने विक्रमी कापूस उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.

''शेतकऱ्यांनी ठिबक शेती केली पाहिजे. परिसरात मोठ्या प्रमाणात ठिबक व तुषार सिंचनचा वापर होत आहे. ओलिता खालील क्षेत्र वाढले आहे. शासकीय सिंचन अनुदानामुळे सिंचनाखाली शेतीचा टक्का मोठा वाढला आहे.'' - भागवत पाटील, संचालक श्री समर्थ कृपा इरिगेशन, कापडणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Level : कोयना धरण निम्म्याहून अधिक भरलं! पण 100 टक्के भरण्यासाठी अजून किती टीएमसी पाण्याची गरज? पाहा लेटेस्ट अपडेट

IND vs ENG Weather Update: भारत-इंग्लंड शेवटच्या टी२० सामन्यात पावसाचा धुमाकूळ की होणार पूर्ण खेळ? हवामान खात्याने दिला 'हा' इशारा...

Latest Marathi News Live Update : येरवडा गणेश नगर परिसरात दोन गटांतील मुलींमध्ये जोरदार हाणामारी

Hingoli: माळसेलूत चिखल तुडवत विद्यार्थी शाळेत ; रस्त्याची दुरवस्था; पालकांत तीव्र संताप; आरोग्याचा प्रश्नही गंभीर, ग्रामपंचायतीचे दुरुस्तीकडे दुर्लक्ष

Maharashtra ATS Raids : पाकिस्तानी गुंडांशी सोशल मीडिया कनेक्शन! कोल्हापूरच्या 2 तरुणांची 10 तास कसून चौकशी; 'एटीएस'कडून राज्यभरात 112 तरुणांची झाडाझडती

SCROLL FOR NEXT