HSC-Exam
HSC-Exam 
उत्तर महाराष्ट्र

मराठीचा पेपर ‘व्हॉट्‌सॲप’वर!

सकाळवृत्तसेवा

जळगाव - माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नाशिक विभागीय मंडळातर्फे सध्या सुरू असलेल्या बारावीच्या परीक्षेंतर्गत आज मराठीचा पेपर होता. पेपर सुरू झाल्यानंतर अवघ्या तासाभरात प्रश्‍नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली. शहरातील नूतन मराठा व बाहेती महाविद्यालय परिसरात परीक्षार्थींना कॉपी पुरविण्यासाठी फिरत असलेल्या काही मुलांच्या मोबाईलमध्ये ही प्रश्‍नपत्रिका आढळून आली. मात्र, प्रश्‍नपत्रिका कुठून ‘लीक’ झाली व पेपर फुटला असला, तरी ही प्रश्‍नपत्रिका परीक्षागृहामधून बाहेर कशी आली, याचा खुलासा अद्याप झालेला नाही. 

बारावीचा आज मराठीचा पेपर होता. माय मराठीचा पेपर असल्याने कॉपी पुरविणारे कमी असतील, असे वाटत असताना पेपर सुरू झाल्याच्या अवघ्या तासाभरातच पेपर सोशल मीडियावर व्हायरल झालेला होता. तसेच मराठीचा पेपर सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे नातेवाइक कॉपी टाकताना दिसून आले.

महाविद्यालयाजवळच काही दुकाने उभारण्यात आलेली आहेत. तेथे बसून गाईडमध्ये पाहून उत्तरे लिहिली जात असल्याचे चित्र आज पाहावयास मिळाले. उत्तर थेट विद्यार्थ्यांना पुरविले जात असल्याचे समोर आले. दरम्यान, कॉपीमुक्त परीक्षेसाठी जिल्हाभरात २१ पथकांची नियुक्ती केली आहे. परंतु सतत परीक्षाथींमध्ये कॉपीचा सर्रास वापर काही थांबत नाही. 

बारा जणांवर कारवाई
परीक्षेच्या पहिल्या दिवशी इंग्रजीच्या पेपरवेळी १४ विद्यार्थ्यांवर कारवाई झाली, तर हिंदीच्या पेपरवेळी ५ जणांवर कारवाई झाली. आज मराठीच्या पेपरवेळी कॉपी करणाऱ्या १२ विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. बारावी परीक्षेसाठी नेमलेल्या भरारी पथकांकडून केंद्रांमध्ये तपासणी करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने आज तपासणीत मराठीच्या पेपरला १२ विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. यात जळगाव येथील नूतन मराठा महाविद्यालयात माध्यमिक शिक्षणाधिकारी डी. पी. महाजन यांच्या पथकाने सहा विद्यार्थ्यांवर कारवाई केली; तर यावल तालुक्‍यातील चिचोली येथील स्कूलमध्ये ‘डायट’चे प्राचार्य गजानन पाटील यांच्या पथकाने ६ जणांवर कारवाई केली.

मराठीचा पेपर मुलाना ‘व्हॉट्‌सॲप’वर नेमका कधी मिळाला, याची चौकशी करावी लागेल. प्रत्यक्ष परिस्थिती पाहिल्यावरच आम्हाला त्यावर प्रतिक्रिया देता येईल. त्यामुळे पेपर फुटला, असे म्हणता येणार नाही. झालाही असेल तर कोणीतरी मुद्दाम हा खोडसाळपणा केला असावा.
- ई. ओ. नेतकर, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT