nashik court.jpg 
उत्तर महाराष्ट्र

जिल्हा न्यायालयात आगीत शेकडो फाइल खाक..कोणत्या होत्या त्या फाईल? 

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जिल्हा न्यायालयाला पोलिसांच्या ताब्यातील मिळालेल्या अडीच एकर जागेत नव्याने सुरू केलेल्या न्यायालयात आग लागून शेकडो फाइल खाक झाल्या. ही घटना बुधवारी (ता. २७) सकाळी उघडकीस आली. अज्ञात संशयिताने काचा फोडून खिडकीतून ज्वलनशील पदार्थ फेकून आग लावल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या आगीत फाइल्स जळाल्याचे पोलिसांनी सांगितले. 
जिल्हा न्यायालयाच्या पाठीमागील बाजूस पोलिसांकडून न्यायालयास अडीच एकर जागा मिळाली आहे. या जागेत नव्याने चार न्यायालय उभारण्यात आले आहेत.

गंगापूर पोलिस ठाण्यातील गुन्ह्यासंदर्भातील फाइल्सची शक्‍यता 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आठ क्रमांकाच्या न्यायालयात ही आग लागली. बुधवारी सकाळी न्यायालयाच्या खिडकीतून धूर येत असल्याची बाब लक्षात आली. त्यामुळे तातडीने अग्निशमन दलास सकाळी साडेसातच्या सुमारास याची माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाने आग विझविली. या न्यायालयात गंगापूर पोलिस ठाण्यातील गुन्ह्यासंदर्भात फाइल्स असल्याचे समजते. न्यायालयीन अधिकारी, वकील यांनी जाळपोळ झालेल्या ठिकाणची पाहणी केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या आगीत फाइल्स, फर्निचरचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात जाळपोळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे न्यायालयाच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा उपस्थित झाला आहे. या आगीत कोणत्या फाइल्स जळाल्या याची माहिती घेतली जात आहे.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी मुंबईला एकटाच जाणार, २ गाड्या आणि १० लोक सोबत; जरांगेंचा निर्णय, मराठा बांधवांना केलं मोठं आवाहन

जरांगेंनी पुनर्विचार करावा, ऐन गणेशोत्सवात आंदोलन योग्य नाही; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

Pune Mumbai Expressway: पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर बस घसरली; कामशेत बोगद्याजवळ तिन्ही मार्गिका बंद, ७ ते ८ किमी वाहनांच्या रांगा

INDIA VS WEST INDIES: वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियात मोठे बदल? पंत-जुरेलमध्ये यष्टिरक्षणासाठी रस्सीखेच, राहुल होणार उपकर्णधार?

Marathi News Live Updates : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निवासस्थानी गणरायाचे उत्साहात आगमन

SCROLL FOR NEXT