Chimthane: ST and Swift Dzire car accident caused damage to both vehicles. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Accident News : Bus- Carअपघातात पती-पत्नी जखमी; कारची Air bag उघडल्याने अनर्थ टळला

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : सोनगीर-दोंडाईचा राज्य महामार्गावर चिमठाणे (ता. शिंदखेडा) गावाजवळ रविवारी (ता. ११) सकाळी अकराच्या सुमारास राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे आगाराची खुंटामुळी-धुळे बस सोनगीरकडे जात असताना समोरून दोंडाईचाकडे जाणारी भरधाव स्विफ्ट डिझायर कार एसटी बसला जोराने धडकली.

यात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून, कारमधील पती व पत्नी जखमी झाले. एअर बॅग उघडल्याने ते दोघे वाचले. (Husband and wife injured in Bus-Car accident Disaster averted opening airbag of car Dhule News)

खुंटामुळी-धुळे एसटी बस (एमएच १४, बीटी १६२०) जात असताना चिमठाणेजवळ समोरून येणाऱ्या भरधाव स्विफ्ट डिझायर कार (एमएच १८, एजी ७८३३)ने धडक दिल्याने एसटी व कारचे मोठे नुकसान झाले.

कारचालक मनोज रमेश जाधव (वय ४०) यांना मुक्का मार लागला असून, पत्नी अनिता मनोज जाधव (३५, दोन्ही रा. धुळे) यांना डोक्याला गंभीर दुखापत झाली. येथील खासगी रुग्णालयात पती-पत्नीवर उपचार केल्यानंतर धुळे येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

अपघाताबाबत बसचालक संजय रघुनाथ सोनवणे (५७ , रा. बोरविहीर, ता.जि. धुळे) यांनी शिंदखेडा पोलिस ठाण्यात खबर दिल्यावरून अपघाताची नोंद करण्यात आली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump ultimatum : ट्रम्प यांचा हमासला ४८ तासांचा अल्टिमेटम! ; म्हणाले, ‘’आता जर ऐकलं नाहीतर...’’

Pune Crime : कुख्यात गुंड नीलेश घायवळचा पासपोर्ट रद्द करणार - पोलिस आयुक्त अमितेश कुमार

Mehbooba Mufti Statement : ‘’लडाख, POKमध्ये Gen-Z… ’’ ; मेहबूबा मुफ्तींनी केलं मोठं विधान!

Gautami Patil News : गौतमी पाटीलच्या अडचणी वाढणार? ; पुणे पोलिसांनी बजावली नोटीस!

IND vs AUS: विराट कोहली आणि रोहित शर्माचे पुनरागमन होणार? ऑस्ट्रेलियाविरुद्ध ODI मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा कधी? तारीख आली समोर

SCROLL FOR NEXT