Husband killed his wife for preparing meal esakal
उत्तर महाराष्ट्र

जेवण न बनविल्याच्या रागातून पतीने पत्नीला पाठविले यमसदनी

पोलिसांत पतीविरुद्ध ठार मारण्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पिंपळनेर (जि. धुळे) : लखाळे पो. वार्सा (ता. साक्री) येथे ३५ वर्षीय महिलेने घरात जेवण बनविले नाही, या गोष्टीचा राग पतीला आल्याने लाकडी दांडक्याने मारहाण करून तीस ठार मारले. ही घटना मंगळवारी (ता. १२) रात्री साडेआठच्या दरम्यान घडली. पिंपळनेर पोलिसांत पतीविरुद्ध ठार मारण्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. (Latest Marathi News)

लखाळे (पो. वार्सा) येथील निर्मला चव्हाण यांनी मंगळवारी रात्री साडेआठला घरात जेवण बनविले नाही, त्या गोष्टीचा तिचा पती गणेश एकनाथ चव्हाण (वय २९, मूळ रा. ताहाराबाद, महादेव मंदिरजवळ, ता. बागलाण, जि. नाशिक) यास राग आल्याने त्याने लाकडी दांडक्याने निर्मला हीच्या डोक्यावर व तोंडावर मारहाण करून गंभीर दुखापत करून ठार मारले. ही घटना पिंपळनेर पोलिसांना समजताच ते घटनास्थळी दाखल झाले. जखमी निर्मला हीस पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. मृत निर्मला हीस चार मुले असून, त्यात आदित्य (वय १०), विजय (७), मुलगी साक्षी (३) व मुलगा पृथ्वी हा तीन महिन्यांचा आहे. सुरमल पवार यांच्या फिर्यादीवरून पिंपळनेर पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. उपनिरीक्षक भाईदास मालचे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

Sansad Ratna Award 2026 : संसदेत ठाण्याचा बोलबाला! म्हस्के, शिंदेंना सलग दुसऱ्यांदा ‘संसदरत्न’

MPSC Marks Verification : एमपीएससी उमेदवारांसाठी मोठी बातमी! गुणपडताळणीसाठी अर्जाची संधी; जाणून घ्या अंतिम तारीख

SCROLL FOR NEXT