Dhule Municipal Corporation esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : बुधबाजारात व्यवसाय थाटल्यास साहित्य जप्त; पुढच्या बुधवारपासून कारवाई

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : शहरातील देवपूर बसस्थानकाजवळ बुधबाजार भरविला जातो. यामुळे रहदारीचा रस्ता बंद होऊन नागरिकांची गैरसोय होते.

त्यामुळे येत्या बुधवारपासून तेथे कोणताही व्यवसाय करू नये अन्यथा संबंधित विक्रेत्यांच्या वस्तू, साहित्य महापालिका अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून जप्त केले जाईल, असा इशारा महापालिकेतर्फे देण्यात आला आहे. (If business is established in Budh Bazar materials will be confiscated dhule news)

शहरातील देवपूर बसस्थानकाजवळ दर बुधवारी बाजार भरविला जातो. बुधबाजार या नावाने हा बाजार प्रसिद्ध आहे. या बुधबाजारात मोठ्या प्रमाणावर छोटे विक्रेते मोकळ्या जागेत तसेच रस्त्यावर दुकाने थाटतात. ग्राहकांचीही मोठी गर्दी या बाजारात खरेदीसाठी उसळते. त्यामुळे या भागात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते.

दरम्यान, महापालिका आयुक्त अमिता दगडे-पाटील यांच्या आदेशाने महापालिकेतर्फे बुधबाजाराच्या ठिकाणी कुणीही व्यवसाय करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. बुधबाजार येथील तात्पुरते दुकाने, पथाऱ्या टाकून व्यवसाय करणाऱ्या सर्व संबंधित व्यावसायिकांना याबाबत इशारा देण्यात आला आला.

बसस्थानकालगत रस्त्यावर तसेच मोकळ्या भूखंडावर रस्त्यांपैकी जमीन बुधवारी बाजार थाटल्याने रहदारीचा रस्ता बंद करून नागरिकांची गैरसोय होत होते. त्यामुळे येत्या बुधवारपासून तेथे कुणीही व्यवसाय करू नये व नागरिकांना त्रास होईल असे कृत्य करू नये. तसे झाल्यास संबंधितांच्या वस्तू व साहित्य मनपा अतिक्रमण निर्मूलन पथकामार्फत जप्त करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे धुळे महापालिकेतर्फे प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

कारवाईनंतर ‘जैसे थे’ स्थिती

बुधबाजारामुळे निर्माण होणाऱ्या समस्येवर यापूर्वीही महापालिकेतर्फे कारवाई करण्यात आली आहे. मात्र, शहरातील इतर भागात होणाऱ्या तात्पुरत्या कारवायांसारखीच ही कारवाईदेखील तात्पुरती ठरली आहे. कारवाईनंतर पुढच्या बुधवारी पुन्हा तेथे बाजार भरतो व परिस्थिती ‘जैसे थे’ पाहायला मिळते. त्यामुळे आता महापालिका आयुक्तांच्या या नव्या आदेशाने किती फरक पडेल यावर प्रश्‍नचिन्हच आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT