Crime news esakal
उत्तर महाराष्ट्र

कॅफेच्या नावाखाली अवैध व्यवसाय

लॉज व कॅफेच्या चालकासह मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे नागरिकांकडून करण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

धुळे : शहरातील नेहरू नगरात लॉज व कॅफेच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय चालविला जात आहे. या प्रकरणी चौकशीसह चालक व मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ज्योत्स्ना धनराज सनेर यांच्यासह नागरिकांनी केली. सामाजिक कार्यकर्त्या प्रभा परदेशी यांच्या नेतृत्वात रहिवाशांनी जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांना निवेदन दिले.

देवपूरमधील नेहरूनगर, वाडीभोकर रोडलगत शनी मंदिराजवळ एक लॉज आहे. या परिसरात सुशिक्षित व शिक्षक वर्ग वास्तव्यास आहे. तसेच कॉलेज, हॉस्पिटल, स्पर्धा परीक्षेचे क्लासेस आहेत. स्थानिक रहिवाशांना ये- जा करण्याचा एकच मार्ग आहे. मात्र, संबंधित लॉज-कॅफेमध्ये चालक व मालक अल्पवयीन मुलींना आणून त्यांचे शारीरिक शोषण करीत आहेत. त्यांना देहविक्रीचा व्यवसाय करण्यास प्रवृत्त केले जाते. लॉज मालकाला समजविण्यास गेले असता त्याने महिला व ज्येष्ठ नागरिकांना शिवीगाळ करत धमकावून परतावून लावले. लॉज व कॅफेच्या चालकासह मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. पुरावा म्हणून निवेदनासोबत पोलिस अधीक्षकांना व्हिडिओ व फोटोची सीडी देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Milk Uninon Kolhapur News : ‘गोकुळ’ उभारण्यासाठी आनंदराव पाटील चुयेकरांनी घरातील सोनेही गहाण ठेवलं; शशिकांत चुयेकर भावुक

Samruddhi Sugar Factory: ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा! समृद्धी कारखाना देणार प्रतिटन ३०० रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान

Viral Story : ९५ हजार पगाराची नोकरी गेली, घरच्यांचं वागणंच बदललं; म्हणाले- तुला जन्म देऊन चूक झाली, २२ वर्षीय तरुणाने पोस्टद्वारे मांडली व्यथा

Dairy Farmers: दूध उत्पादकांचे अर्थकारण कोलमडले; पशुखाद्याच्या दरात चार महिन्यांत २५ ते ३५ टक्के वाढ, दुधाच्या दराचा ताळमेळ बसेना

Maharashtra Live News : ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील निवडणूक मोदी शाहांनी आपल्यावर घेतली : आशुतोष रांका

SCROLL FOR NEXT