crime esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Crime News : पोलिसांनी मद्य तस्कारांच्या आवळल्या मुसक्या; अवैध दारू जप्त

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Crime News : लक्कडकोट (ता. नवापूर) येथे नाकाबंदी करून उपविभागीय पोलिस अधिकारी संजय महाजन यांनी महिंद्र बोलेरोमधून अवैध मद्याची वाहतूक करताना वाहनासह १६ लाख ९३ हजार रुपये किमतीची अवैध दारू जप्त केली.(Illegal liquor and vehicle seized by police nandurbar crime news )

३० ऑक्टोबरला नंदुरबार उपविभागीय पोलिस अधिकारी संजय महाजन यांच्या पथकाने नवापूर पोलिस ठाणे हद्दीत लक्कडकोट रस्त्यावर करंजी खुर्द गाव येथे अचानक नाकाबंदी राबवून वाहनांची तपासणी करताना पांढऱ्या रंगाची महिंद्र बोलेरो पिक-अप वाहन येताना दिसले म्हणून पथकातील पोलिस अधिकारी व अंमलदारांनी टॉर्चच्या सहाय्याने वाहन थांबविण्याचा इशारा दिला, चालकाने वाहन न थांबविता भरधाव पुढे निघून गेला.

पथकाने बोलेरो वाहनाचा पाठलाग करून थांबवून पाहणी केली असता त्यात १४ लाख ७६ हजार ४० रुपये किमतीची देशी दारू व वाहन जप्त केले. तसेच सुरेश सरजा गावित (वय ३५, रा. सरी, ता. नवापूर) व सुनील रमेश गावित (२९, रा. धनबर्डी, ता. नवापूर) यांच्याविरुद्ध नवापूर पोलिस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पथकाने नवापूर पोलिस ठाणे हद्दीतील नवापूर ते लक्कडकोट मार्गावर नीलेशकुमार गोपूभाई कोकणी (४०, रा. आंबा (निशालफळी), ता. सोनगड, जि. तापी, गुजरात) हा स्कूटीवर देशी-विदेशी दारूची विक्री करताना मिळून आल्याने त्याच्या ताब्यातून दोन लाख १७ हजार ८०० रुपये किमतीचे देशी-विदेशी मद्य व बियर असा मुद्देमाल हस्तगत करून त्याच्याविरुद्ध नवापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

नवापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या पथकाने नवापूर पोलिस ठाणे हद्दीत अवैध गावठी हातभभट्टीची दारू तयार करणारे व त्यांची विक्री करणाऱ्या पाच व्यक्तींविरुद्ध कारवाई करून त्यांच्याकडून २१ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून त्यांच्याविरुद्ध नवापूर पोलिस ठाण्यात दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

नंदुरबार जिल्हा पोलिस दलाने नंदुरबार जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या ठिकाणी आंतरराज्य नाकाबंदी केली असून, तेथे पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार तैनात करण्यात आले आहेत.

नाकाबंदीच्या ठिकाणी अधिकारी व अंमलदारांचे पथक २४ तास कार्यान्वित असून, गुजरातमार्गे राजस्थान व मध्य प्रदेशात जाणाऱ्या वाहनांची त्यांच्याकडून कडक तपासणी करण्यात येत आहे. अवैध दारूची चोरटी वाहतूक थांबविण्यासाठी व जंगल परिसरात लपवून दारूचा साठा शोधून काढण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी अशा ठिकाणांचा शोध घेण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांची मदत घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT