Additional Superintendent Kishore Kale, Deputy Superintendent of Police Sachin Hire, Assistant Police Inspector Suresh Shirasat and colleagues while inspecting the seized liquor stock.  
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News: हाडाखेडजवळ 33 लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : मुंबई -आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील हाडाखेड (ता.शिरपूर) जवळ सुळे फाटा येथे अवैधरित्या मद्याची वाहतूक करणारा कंटेनर सांगवी पोलिसांनी जप्त केला.

सोमवारी (ता.१८) सकाळी झालेल्या या कारवाईत ३३ लाख रुपयांच्या मद्यासह एकूण ५३ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला. (Illegal liquor stock worth 33 lakhs seized near Hadakhed dhule crime news)

या कारवाईबद्दल पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर अधीक्षक किशोर काळे यांनी सांगवी पोलिसांचे कौतुक करून दहा हजार रुपयांचे विशेष पारितोषिक जाहीर केले.

मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात शिरपूरकडे अवैध मद्याची वाहतूक सुरू असल्याची माहिती सांगवी पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सुरेश शिरसाट यांना मिळाली होती. त्यांनी पेट्रोलिंग करीत संशयित कंटेनरचा शोध घेतला. सकाळी सुळे फाट्याजवळ कंटेनर दिसून आला. पोलिसांनी पाठलाग करून कंटेनर (डीडी ०१, इ ९८९५) थांबवला. चालकाची चौकशी करुन पोलिसांनी वाहन ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले. कंटेनरच्या झडतीत पोलिसांनी विविध कंपनीचे विदेशी मद्याच्या बाटल्या जप्त केल्या.

सदर बाटल्यांवर केवळ पंजाब राज्यात विक्रीसाठी असल्याचे नमूद केले होते. बारकोड लक्षात येऊ नये म्हणून प्रत्येक बाटलीचे लेबल खोडल्याचे आढळले. या कारवाईत एकूण ५३ लाख १६ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी ट्रकचालक नरेशकुमार तुकाराम जाट (वय २०, राजस्थान) याला अटक करण्यात आली.

पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सुरेश शिरसाट, उपनिरीक्षक संदीप पाटील उपनिरीक्षक सुनील वसावे, हवालदार संदीप ठाकरे, योगेश मोरे, दिनकर पवार, स्वप्नील बांगर, कृष्णा पावरा, संतोष पाटील, अल्ताफ मिर्झा यांनी ही कारवाई केली.

"३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर ही वाहतूक सुरु असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे. कंटेनरमधील मालाची डिलिव्हरी धुळे येथे देण्याबाबत चालकाला संशयितांनी सूचित करण्यात आले होते. यापूर्वी केवळ प्रतिबंधात्मक कारवाई होत असे. त्याचा गैरफायदा संशयित घेत असत. " -किशोर काळे, अपर पोलिस अधीक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT