The seized pickup. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : पिकअप मधून गायींची वाहतूक; सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल जप्त

पीकअप वाहनातून कत्तलीच्या इराद्याने गायींची वाहतूक करणारी पिकअप शिंदखेडा पोलिसांनी जप्त करत सात गोवंश यांची मुक्तता करीत तीन लाख ३५ हजारांचा ऐवज जप्त केला.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : पीकअप वाहनातून कत्तलीच्या इराद्याने गायींची वाहतूक करणारी पिकअप शिंदखेडा पोलिसांनी जप्त करत सात गोवंश यांची मुक्तता करीत तीन लाख ३५ हजारांचा ऐवज जप्त केला. (illegal Transportation of cows by pickup dhule crime news)

दोंडाईचा-सोनगीर राज्य महामार्गावर चिमठाणे गावशिवारात ही कारवाई करण्यात आली. सोनगीर-दोंडाईचा राज्य महामार्गावर चिमठाणे गावशिवरात मंगळवारी (ता.१९) दुपारी साडेबाराला सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक गुलाब ठाकरे, हवालदार प्रशांत पवार, पोलिस नाईक साबीर शेख, पोलिस कर्मचारी विशाल सोनवणे व किरण पारधी यांनी चिमठाणे गावशिवारात सापळा रचून गायींची वाहतूक करणाऱ्या पिकअप (एमएच १८ बीजी ०८३६) यास थांबवित वाहनाची तपसाणी केली असता त्यात गायी, वासरे मिळून आली.

याबाबत चालक मच्छिंद्र कृष्णनाथ गिरासे (रा. सुराय ता. शिंदखेडा) याच्याकडे विचारपूस केली असता त्याने या गायी खरेदी केल्याचे सांगितले. यावर पोलिसांनी खरेदीच्या पावत्यांची मागणी केली असता त्याच्याकडे कोणत्याही प्रकारच्या पावत्या मिळून आल्या नाही. त्यानंतर पोलिसांनी चार गायी, एक गोऱ्हा व दोन वासरी यांची मुक्तता करीत चालकाविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करीत सव्वा तीन लाखाचा ऐवज जप्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loan Waiver: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी; खात्यात पोहोचले हजारो कोटी

आनंदाची बातमी! पुण्यात १३ लाखांत मिळणार घर, म्हाडाकडून ४४६२ घरांसाठी लॉटरी जाहीर

Pune Crime: विमा योजना संपली, पैसे मिळणार सांगून गंडा; वाघोलीतील व्यक्तीला ४० लाखांचा ऑनलाइन चुना

Ujani Water: उजनीचे पाणी वाया, बोराळे नंदूरचे तलाव कोरडे! शेतकऱ्यांसह शिवसेना पदाधिकाऱ्यांचा संताप, कार्यालयात ठिय्या

Hockey World Cup: भारतीय संघाचं विश्वविजयाचं स्वप्न भंगलं! अर्जेंटिनाकडून 'करो या मरो'च्या सामन्यात पराभवाचा मोठा धक्का

SCROLL FOR NEXT