Crime News esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : चिथावणी दिल्या प्रकरणी उपसरपंचासह 30 जणांवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : वटपौर्णिमेच्या पूजेसाठी जाणाऱ्या महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या अंगावर कचरा फेकल्याच्या कारणावरून निजामपूर (ता. साक्री) येथे वाद झाला.

त्यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करीत जमावाने निजामपूर पोलिस ठाण्यात गर्दी केली.

तसेच दोन गटांत तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने चिथावणी दिली. या प्रकरणी उपसरपंचासह २५ ते ३० जणांवर निजामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. (In case of provocation Crime against 30 people including Deputy Sarpanch Controversy over dumping of garbage in Nizampur Dhule News)

याबाबत पोलिस कर्मचारी दीपक महाले यांनी फिर्याद दिली. त्यानुसार रविवारी (ता. ५) सायंकाळी पावणेआठच्या सुमारास हा प्रकार घडला.

जैताणेतील उपसरपंच बाजीराव ऊर्फ पिंटू बुवाजी पगारे, कमलेश अनिल भामरे, दशरथ शेलार, चंदब जाधव, बादल अहिरे, राहुल हसमुखलाल जयस्वाल, मनीष संजय खैरनार सर्व (रा. निजामपूर), ज्ञानेश्‍वर पंडित पवार (रा. आमखेल), हर्शल सोनवणे (रा. राणेनगर, निजामपूर) व इतर १५ ते २० जणांनी पोलिस ठाण्यात येत महिला कर्मचाऱ्याशी मोईन पिंजारी व त्याच्या घरातील दोघांनी कचरा अंगणात टाकल्याच्या कारणावरून वाद घातल्याने त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करीत चिथावणी दिल्याचे नमूद आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT