District Collector Abhinav Goyal while interacting with Ganesha idol made by prisoners. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Ganeshotsav News : कैद्यांनी साकारल्या आकर्षक गणेशमूर्ती! कारागृहाबाहेर विक्रीस उपलब्ध

सकाळ वृत्तसेवा

Dhule Ganeshotsav News : श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर येथील जिल्हा कारागृहातील कैद्यांनी आकर्षक शाडूच्या श्रीगणेशमूर्ती साकारल्या आहेत.

त्या भाविकांना उपलब्धतेसाठी कारागृहाबाहेर स्टॉलची मांडणी करण्यात आली आहे. या स्टॉलचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते मंगळवारी (ता. १२) उद्‌घाटन झाले.

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते श्रीगणेशमूर्ती साकारण्याची कामगिरी करणाऱ्या कैद्यांचा सत्कार झाला. (inmates of District Jail made an attractive Shadu idol of Shri Ganesha dhule news)

कारागृह अधीक्षक विशाल बांदल, तुरुंगाधिकारी सचिन झिंजुर्डे, रक्षक सूर्यकांत पाटील, उदय सोनवणे, कैलास चौधरी, कमलाकर दुसाने, अनिल बोलकर, बाळू चव्हाण, सुभेदार पांडुरंग चौरे, भगवान सरदार, विलास खलाणे, भदाणे गुरुजी आदी उपस्थित होते.

कारागृहातील कैद्यांना रोजगार उपलब्धतेसाठी गणेशमूर्ती साकारण्याचा उपक्रम राबविण्यात आला. त्यासाठी नेमणुकीतील कारागृह शिपाई सूर्यकांत पाटील यांनी नेटाने कर्तव्य बजावल्याबद्दल त्यांचा प्रशस्तीपत्राद्वारे गौरव करण्यात आला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

खुले कारागृहातील कैदी फुलाराम नवरामजी मेघवाड याने नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात उत्कृष्ट गणेशमूर्ती साकारत शासनास मोठ्या प्रमाणात निधी मिळवून दिला होता.

पुढील शिक्षा भोगण्यासाठी त्यास धुळे जिल्हा खुले कारागृहात पाठविण्यात आले. त्यामुळे त्याने येथील कारागृहात इतर कैद्यांना श्रीगणेशमूर्ती साकारण्याचे प्रशिक्षण दिले. गोपाळ माधव गायकवाड, विलास लक्ष्मण कोळी, सोपान रघुनाथ काशीद, हरीश धीरूभाई पटेल यांनी शाडू गणेशमूर्ती साकारून शासनास निधी मिळवून दिला. या कैद्यांचा उत्तम कामगिरी केल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: 'श्रेयस, जैस्वाल, सिराज पाकिस्तानमध्ये असते, तर...' भारतीय संघातून वगळल्यानंतर माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

Thane News: काँग्रेस नेत्यांवर थेट आरोप! माजी नगरसेवकांचा पक्षत्याग, भाजपात प्रवेश करत नाराजी उघड केली

गिरीश ओक-निवेदिता सराफची जोडी पुन्हा पहायला मिळणार, 'बिन लग्नाची गोष्ट'सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, प्रिया बापट आणि उमेश कामतची गोड केमिस्ट्री

Maharashtra Latest News Update: राष्ट्रीय महामार्गांवर दुचाकी वाहनांना टोल नाही, NHAI चे अधिकृत स्पष्टीकरण

Soldier caught pigeon on border : भारत-पाकिस्तान सीमेजवळ जवानांनी पकडलं एका गंभीर धमकीच्या पत्रासह कबुतर!

SCROLL FOR NEXT