A happy student after painting a picture and members of Inqlab with students participating in the painting competition.  esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : सुप्तगुणांना वाव मिळण्यासाठी ‘त्यांच्या’ भावविश्वात भरले रंग! ‘इन्कलाब’चा स्तुत्य उपक्रम

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : लहान मुलांना बालपणीच योग्य संस्कार मिळाल्यास आकाशाला गवसणी घालण्याइतपत जिद्द त्यांच्यात निर्माण होते.

फक्त त्यांना योग्य मार्गदर्शन हवे. लहान मुलांच्या अंगी असलेल्या सुप्तगुणांना वाव मिळावा यासाठी शहरातील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या इंकलाब फाउंडेशनतर्फे झोपडपट्टीत राहणाऱ्या गरीब मुलांच्या पंखांना बळ मिळावे यासाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. (Inquilab Foundation organised drawing competition for poor children living in slums nandurbar news)

येथील इन्कलाब फाउंडेशन ही संस्था शहर व परिसरात अनेक सामाजिक उपक्रम राबवत असते. नावीन्यपूर्ण उपक्रम राबविताना प्रत्येक वेळी असाच इन्कलाब फाउंडेशनचा प्रकल्प एक प्रेरणा घेऊन येतो. या वेळी संस्थेतील सदस्यांनी झोपडपट्टी भागात राहणाऱ्या मुलांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती.

अशा उपक्रमांमुळे या वंचित मुलांना शाळेत जाण्यासाठी आणि त्यांचे शिक्षण घेण्यासाठी प्रेरणा मिळू शकते. या उपक्रमात २८ मुलांनी भाग घेतला. फाउंडेशन करून देण्यात आलेल्या चित्रांना त्यांनी रंग देण्याचा आनंद घेतला. या वेळी चित्र रंगविताना त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता.

मुलांना प्रेरणा मिळावी व त्यांच्यात जिद्द निर्माण व्हावी यासाठी फाउंडेशनतर्फे पहिल्या तीन चित्रांसाठी रोख स्वरूपाचे बक्षीसही देण्यात आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या वेळी मुलांच्या कलात्मक प्रतिभेची केवळ ओळखच नाही तर त्यांचे तोंडभरून कौतुकही केले. त्यांना त्यांचे प्रयत्न सुरू ठेवण्यासाठी प्रोत्साहित केले. याव्यतिरिक्त कार्यक्रमादरम्यान खाद्यपदार्थ आणि थंडपेय दिले, ज्यामुळे मुलांसाठी आनंददायी आणि प्रोत्साहित वातावरण निर्माण झाले.

या वेळी फाउंडेशनच्या सदस्यांशी संवाद साधला असता ते म्हणाले, की या मुलांसाठी शिक्षणाशी संबंधित महिन्यातून एकदा उपक्रम राबविण्याचीही आमची योजना आहे. त्यांना नियमितपणे शाळेत जाण्यास, त्यांच्या अभ्यासात स्वारस्य आणि सक्रिय राहण्यास, प्रवृत्त करण्यात आमचा सातत्यपूर्ण सहभाग आणि पाठिंबा देण्याचा हेतू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyclone Shakti: शक्ती चक्रीवादळ कुठे पोहोचले? धोका नेमका कधी टळणार? हवामान खात्याकडून तारीख जाहीर

Ramdas kadam : रामदास कदम यांचा आणखी एक खळबळजनक दावा, थेट उद्धव ठाकरेंना आव्हान

Crime News : गोळीबार प्रकरण: पंचवटी पोलिसांकडून १४वा संशयित जेरबंद, आतापर्यंत माजी नगरसेवकासह १४ अटकेत

World Cup 2025: भारताविरुद्ध पाकिस्तानने टॉस जिंकला, प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल; हस्तांदोलन झालं की नाही?

Sangli Accident Death : काम संपवून घरी निघाला होता, समोरू दुचाकी आली अन् दोघेही जाग्यावर संपले; सांगलीतील घटना

SCROLL FOR NEXT