खेळाडूंची चमकदार कामगिरी esakal
उत्तर महाराष्ट्र

आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिपमध्ये खेळाडूंची चमकदार कामगिरी

निखिल सुर्यवंशी

धुळे : नेपाळची राजधानी काठमांडू येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिपमध्ये जयहिंद मार्शल आर्टस ॲकॅडमीच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत एक सुवर्ण व पाच कांस्यपदकांची कमाई केली.

मुंबई येथे झालेल्या राष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक प्राप्त केलेल्या खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली होती. विद्यार्थ्यांची ही गुणवत्ता लक्षात घेता, जयहिंद शैक्षणिक ट्रस्टतर्फे सर्व सहा खेळाडूंना नेपाळ दौऱ्यासाठी आर्थिक सहकार्य केले.

खेळाडूंनी स्पर्धेत चमकदार कामगिरी करत पदकांची कमाई केली. या सर्व खेळाडूंना जयहिंद मार्शल आर्टस ॲकॅडमीचे अध्यक्ष व मुख्य प्रशिक्षक ॲड. दुष्यंतराजे देशमुख यांचे मार्गदर्शन व प्रशिक्षण लाभले. या यशाबद्दल सर्व विजयी खेळाडू व प्रशिक्षक ॲड. देशमुख यांचा जयहिंद संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला.

संस्थेचे चेअरमन डॉ. अरुण साळुंखे, व्हाइस चेअरमन प्रमोद पाटील, सचिव प्रदीप भदाणे, संचालक अजित मोरे, वसंतराव ईशी, प्रा. सुधीर पाटील, प्रा. नीलिमा पाटील, संचालिका तथा नगरसेवक प्रतिभा चौधरी, चंद्रशेखर पाटील, नाना कोर, शेखर पाटील, माजी चेअरमन तथा संचालक विजय पाटील, ॲड. राजन पाटील, डॉ. अनिल चौधरी, स्मिता साळुंखे आदी उपस्थित होते.

पदकप्राप्त खेळाडू
सुवर्णपदक- इच्छिता आनंद गावडे, कांस्यपदक- शिवराज दुष्यंतराजे देशमुख, कावेरी राजेंद्र पाटील, हरिसिद्धी युवराज गिरासे, रसिका नितीन पवार, प्राची जितेंद्र पाटील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : अन्याय, भ्रष्टाचारावर शांत बसत असाल तर…, तुकाराम मुंढेंच्या पोस्टने लक्ष वेधलं

Ganeshotsav Rain Forecast : गुड न्यूज! महाराष्ट्रात पुन्हा पावसाला पोषक हवामान; गणेशोत्सव काळात जोरदार पावसाचा अंदाज

Maharashtra Cabinet: दिलीप वळसे-पाटलांच्या विरोधानंतर मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; डिंभे-माणिकडोह जोडबोगद्याला अखेर स्थगिती

Maharashtra Monsoon: शेतकऱ्यांची चिंता वाढली! राज्यातील ८३ तालुक्यांत २० दिवसांहून अधिक पाऊस गायब; खरीप पिके करपण्याच्या मार्गावर

Amruta Fadnavis: गरबा सर्वसमावेशक उत्सव; मुस्लिमांच्या प्रवेशाला विरोध का? अमृता फडणवीस यांची भूमिका

SCROLL FOR NEXT