self defence ternig 
उत्तर महाराष्ट्र

जळगावात पाच हजार मुलींना मिळणार स्वः रक्षणाचे धडे...

सकाळ वृत्तसेवा

जळगाव ः युवतींना जर स्वःरक्षणाचे धडे मिळाले असते तर हिंगणघाट (जि.वर्धा), निर्भया प्रकरणे झाली नसती. यामुळे युवतींना स्वः रक्षणाचे धडे देण्यासाठी "अभाविप' ने पुढाकार घेतला आहे. तीन फेब्रुवारीपासून जळगाव शहरातील प्रत्येक महाविद्यालय, शाळांमध्ये "मिशन साहसी अभियान' राबविले जाणार आहे. 

अभाविपचे प्रदेश सहमंत्री सिद्धेश्‍वर लटपटे यांनी आज पत्रकार घेतली. यात पुढे बोलतांना ते म्हणाले, की जळगावमध्ये 10 फेब्रुवारीपर्यंत हे अभियान सुरू असेल. शहरातील विविध महाविद्यालय, शाळेतील विद्यार्थ्यांना स्वरक्षणाचे धडे दिले जातील. 11 फेब्रुवारीस शिवतीर्थ मैदानावर "मिशन साहसी प्रात्यक्षिकाचे भव्य सादरीकरण सकाळी आठ ते अकरा दरम्यान होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय खेळाडू 
बबिता फोगाट, अभाविप पश्‍चिम क्षेत्र विद्यार्थिनी प्रीती नेगी उपस्थित राहतील. पाच हजार विद्यार्थिनींना 
भव्य कार्यक्रमात एकावेळी प्रशिक्षण दिले जाईल. अभियानासाठी शहरातील विविध क्षेत्रातील महिलांची समिती गठीत करण्यात आली आहे. अध्यक्षपदी डॉ. प्रीती अग्रवाल, कार्याध्यक्ष डॉ.आरती हूजूरबाजार, सचिव प्रतिमा याज्ञिक, उपाध्यक्षा मंगला बारी, संरक्षक खासदार रक्षा खडसे, आमदार स्मिता वाघ, जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील, महापौर भारती सोनवणे, नगराध्यक्षा साधना महाजन, सदस्य रेवती शेंदूर्णीकर, यासह अनेक सदस्यांचा सहभाग आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT