उत्तर महाराष्ट्र

"सिव्हिल'च्या दलालांकडून दिव्यांगांची आर्थिक लूट 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : अपंगत्व प्रमाणपत्र नूतनीकरणासह टक्केवारी वाढवून देण्यासाठी जिल्हा रुग्णालयातील दलालाने तीन हजार रुपयांत फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे. त्याचप्रमाणे अपंगांच्या कागदपत्रांच्या सत्यप्रतीही पोबारा केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, जिल्हापेठ पोलिस ठाण्यात विश्‍वास रंगराव पाटील (वय 47, कंकराज, ता. पारोळा) यांच्या तक्रारीवरून उमेश पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

कंकराज (ता. पारोळा) येथील रहिवासी विश्‍वास रंगराव पाटील, जळगाव शहरातील विश्‍वभारती या सिक्‍युरिटी गार्ड कंपनीत गार्ड म्हणून कार्यरत आहेत. जन्मापासून उजव्या हाताचे अपंगत्व असल्याने शासनाकडून त्यांना 40 टक्के अपंगत्वाचे प्रमाणपत्र देखील मिळाले आहे. याच प्रमाणपत्राची मुदत 12 सप्टेंबर 2019 रोजी संपल्यावर नूतनीकरण करण्यासाठी 18 सप्टेंबरला विश्‍वास पाटील यांनी जिल्हा रुग्णालय गाठले. याठिकाणी डॉ. शेख यांनी तपासणी करून तुमचे अपंगत्व दुरुस्त होऊ शकते. त्यासाठी तुम्हाला ऍडमिट व्हावे लागेल, असा सल्ला दिला. मात्र, त्यांना दाखल करून घेण्यात आले नाही. मात्र, याच आवारात अपंगत्व प्रमाणपत्रांची कामे करणाऱ्या एका दलालाशी त्यांची गाठभेट झाली. उमेश पाटील नावाच्या या तरुणाने याचाच गैरफायदा घेत त्यांची 3 हजारात फसवणूक केली असून, आज या प्रकरणात जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक प्रशांत पाठक तपास करीत आहेत. 

लोकशाही दिनात धाव 
शासकीय रुग्णालयाच्या आवारात उमेश पाटील याने आधारकार्ड, पॅनकार्ड, जुने प्रमाणपत्र, ऑनलाइन अर्जाची प्रत, सिव्हिलचे केस पेपर, अपंग हाताचे एक्‍स-रे आदी मूळ दस्तऐवजासह 3 हजार रुपये घेऊन सहा महिने लोटले. तरी प्रमाणपत्रही मिळेना आणि पैसे घेणारा उमेश पाटील फोनही (9421377525) घेत नसल्याने विश्‍वास पाटील यांनी सुरवातीला जिल्हा रुग्णालयातील अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. पोलिस ठाणेही गाठले. मात्र, त्यांची दखल घेतली गेली नाही. अखेर लोकशाही दिनात तक्रार केल्यावर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश झाले. 

..नशिबाची अशीही थट्टा 
विश्‍वास पाटील यांच्या हाताला जन्मत:च 40 टक्के अपंगत्व आहे. शासनातर्फे त्यांना 15 टक्केच अपंगत्वाचे प्रमाणपत्र तेही 3 महिन्यांसाठी दिले गेले. प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी गेल्यावर, डॉक्‍टर दादपुकारा घेईना म्हणून ऐकीव माहितीवर दलालाच्या जाळ्यात ओढले गेले. त्याने 40 टक्‍क्‍याचे 45 टक्के करून आणण्याची हमी देत तीन हजारात लुबाडले. नशिबाने अपंगत्व, त्यात 15 टक्केचे प्रमाणपत्र, कष्टाचे तीन हजार घेऊन भामटा पसार झाल्याने नशिबानेच थट्टा मांडल्याची उद्विग्न भावना विश्‍वास पाटील यांनी व्यक्त केली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT