culecuter office
culecuter office 
उत्तर महाराष्ट्र

नियम मोडल्याने तहसीलदार, पोलिसांच्या वाहनांवरही कारवाई 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव: जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांनी रस्ते सुरक्षा समिती बैठकीत कठोर शब्दांत आदेश दिल्यानंतर आज उपप्रादेशिक परिवहन विभाग, पोलिस वाहतूक शाखेने राबविलेल्या संयुक्त मोहिमेत 80 वर वाहनधारकांवर विमाहेल्मेट व विना सीटबेल्टप्रकरणी कारवाई केली. यात तहसीलदारांच्या वाहनचालकासह काही पोलिस कर्मचाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला. 

रस्ते सुरक्षा समितीची महत्त्वपूर्ण बैठक बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी रस्ते सुरक्षा नियमांबाबत अधिकारी, कर्मचाऱ्यांना अक्षरश: धारेवर धरले. शासकीय अधिकारी, कर्मचारीच नियम पाळत नसतील तर नागरिक कसे पाळणार? असा प्रश्‍न उपस्थित करत दुचाकीस्वारांना हेल्मेटसक्ती व चारचाकीवर सीटबेल्ट सक्तीची अंमलबजावणी शासकीय कार्यालयांपासून सुरू करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. 

बुधवारी आदेश, गुरूवारी कारवाई 
जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी यासंदर्भात सूचना दिल्यानंतर गुरूवारी तत्काळ या मोहिमेची अंमलबजावणी जिल्हाधिकारी कार्यालयापासून करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रवेशद्वारावर वाहतूक शाखेचे निरीक्षक देविदास कुनगर, पोलिस उपनिरीक्षक दिलीप पाटील व तीन-चार कर्मचाऱ्यांचे पथक तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्‍याम लोही यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक, कर्मचारी अशा संयुक्त पथकाने ही मोहीम सकाळी 10 वाजेपासून राबविण्यास सुरवात केली. 

40 हजारांवर दंड 
या मोहिमेंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांसह अन्य नागरिकांच्या वाहनांवर कारवाई करण्यात आली. जळगाव तहसीलदारांच्या वाहनावरील चालकास सीटबेल्टप्रकरणी मेमो देण्यात आला. काही पोलिसांनी हेल्मेट न घातल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. केंद्र सरकारच्या बीएसएनएलचे वाहनही या कारवाईतून सुटले नाही. 75 विनाहेल्मेटधारी वाहनधारकांवर तर 12 चारचाकी चालकांना सीटबेल्ट नसल्याने दंडाचा मेमो देण्यात आला. जिल्हापरिषद इमारतीच्या आवारातही कारवाई करण्यात आली. जवळपास 42 हजार रुपये दंड यातून वसूल झाल्याची माहिती निरीक्षक देविदास कुनगर यांनी "सकाळ'शी बोलताना दिली. 

..त्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत 
कारवाईच्या या मोहिमेदरम्यान काही वाहनचालकांनी नियमाप्रमाणे हेल्मेट घालून, चारचाकीत सीटबेल्ट बांधून जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश केला. अशा वाहनचालकांचा गुलाबपुष्प देऊन सत्कारही वाहतूक पथकाने केला. 

सर्वच कार्यालयात कारवाई 
नियम पाळण्याची सुरवात शासकीय कार्यालयांपासून झाली पाहिजे, या हेतूने ही कारवाई शासकीय कार्यालयांपासून सुरू झाली आहे. आता टप्प्याटप्प्याने सर्वच शासकीय कार्यालयीन परिसरात ही कारवाई आठवडाभर करण्यात येईल. वाहतूक शाखेच्या 100 पोलिसांनाही हेल्मेटसक्ती केली असून, त्यांनी अंमलबजावणी सुरू केली आहे. आठवड्यानंतरच्या टप्प्यात सामान्य नागरिक, वाहनचालकांची तपासणी करून कारवाई करण्यात येईल, असे श्री. कुनगर यांनी सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Samruddhi Accident: समृद्धी महामार्गावरील अपघात कधी थांबणार? कारला मागून धडक दिल्याने तिघांचा मृत्यू

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

'मुझे क्यों तोड़ा'; कंगना रनौतने भर सभेत तेजस्वी सूर्यांवर केली टीका; नेमका काय घोळ झाला?

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान मोदी आज राम मंदिरात जाऊन घेणार रामलल्लाचे दर्शन

SCROLL FOR NEXT