chor 
उत्तर महाराष्ट्र

जळगाव शहरातील उच्चभ्रु वस्तीची सुरक्षा वाऱ्यावर 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील मोहाडीरोड आदर्शनगर, गणपतीनगर हा परिसर उच्चभ्रु वस्ती म्हणून ओळख आहे. परंतू या उच्चभ्रु वस्तीमध्ये चोरट्यांनी धुमाकळू घातला असून सलग चौथ्या दिवशी घरफोडी करून चोरटे पसार झाले आहे. आदर्शनगर परिसरातील लायन्स सभागृहाच्या मागील बाजुस नसीम तडवी यांच्या बंद घरात चोरट्यांनी कडीकोयंडा तोडून आत प्रवेश करत खोल्यांमधील साहित्य अस्ताव्यस्त फेकत चोरट्यांनी 
दागिने व रोकड असा साडेतीन लांखाचा ऐवज लंपास केला. 

ट्रेझरी ऑफीसर नसीम तडवी लायन्स सभागृहा मागे कुटूंबीयांसह वास्तव्यास आहेत. कामानिमीत्त ते कुटूंबीयांसह यावल येथे सकाळीच गेले होते. रात्री येण्यास उशिर झाला म्हणून तडवी कुटूंबीय तेथेच मुक्कामी थांबले. जळगावच्या घरी महाविद्यालयात शिक्षण घेणारी लहान मुलगी असल्याने ती रात्री नऊ वाजता घरबंद करुन आजीकडे गेली होती. सकाळी येवुन बघीतल्यावर घराच्या मुख्य दाराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी स्वयंपाक घरासहीत दोन्ही खोल्यातील कपाटांचे दार तोडून आतील दागिने त्यात पेन्डॉल, 
अंगठ्या, मंगळसुत्र, कानातले टॉप्स अशा चिजवस्तुसह 15 हजार रुपये रोख असा साडेतीन लाखांचा ऐवज चोरुन नेला. नसीम काझी यांच्या तक्रारीवरुन रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 

परिसरात सिसीटीव्ही नाही 
शहरातील उच्चभ्रु श्रीमंताचा रहिवास असलेल्या आदर्शनगर परिसरात बहुतांश आपार्टमेंट मध्ये सीसीटीव्ही लावण्यात आलेले नाहीत. कॉलनीतील मुख्य चौकात आणि प्रमुख रसत्यांवर सिसीटिव्ही लावणे आवश्‍यक असुन येणाऱ्या जाणाऱ्यांसह संशयीतांवर नजर ठेवणे सोपे होईल. पोलिसांनी आदर्शनगरातील रहिवाश्‍यांना सीसीटीव्ही बाबत आवाहन केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ram Mandir Donation Details: चार वर्षांत अयोध्येतल्या राम मंदिराला किती दान मिळालं? सोनं आणि पैसा बघून बसेल धक्का!

IND vs AFG 3rd ODI: रोहित - जैस्वालने एकही चेंडू न खेळताही भारताला मिळाल्या ५ धावा, पण का? जाणून घ्या खरं कारण

Raigad Drone Row: रायगडावर शिवप्रेमींच्या नैसर्गिक विधीचे ड्रोन चित्रीकरण; लौकिक गोळे यांच्यावर आयटी कायद्यान्वये गुन्हा दाखल

Omraje Nimbalkar : पवनराजे हत्या प्रकरणाच्या निकालाबाबत उच्च न्यायालयात जाणार

Balewadi News : पदपथावर बेकायदेशीर कूपनलिका (बोअरवेल) खोदकाम? जागरूक नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला

SCROLL FOR NEXT