hingona accidaant 
उत्तर महाराष्ट्र

हिंगोणा अपघात ग्रस्तांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत

सकाळ वृत्तसेवा

जळगाव ः हिंगोणा (ता.यावल) येथे मध्यरात्री झालेल्या अपघातात ठार झालेल्या व्यक्ती व जखमींना 
मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळावी यासाठी जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे प्रस्ताव आज पाठविला आहे. दरम्यान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी अपघातातील जखमींची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली आहे. तर अपघाताबाबत शोक व्यक्त केला आहे. 

फैजपूर हिंगोणा रस्त्यावर क्रुझरला मध्यरात्री दिलेल्या डंपरने दिली होती. त्यात बारा जण ठार तर पाच जण जखमी झाले आहे. त्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळावी यासाठी आज जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी नाशिक महसूल आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविला आहे. प्रभाकर नारायण चौधरी, मंगलाबाई ज्ञानेश्‍वर चौधरी, प्रभाबाई प्रभाकर चौधरी, सोनाली जितेंद्र चौधरी, प्रियंका नितीन चौधरी, 
अश्‍लेष उमेश चौधरी, सोनल सचिन महाजन, रिया जितेंद्र चौधरी, शिवम प्रभाकर चौधरी, धनराज गंभीर तायडे (सर्व चिंचोल, रा.मुक्ताईनगर), सुमनबाई श्रीराम पाटील, संगीता मुकेश पाटील (दोघे रा. रावेर) हे मृत झाले आहे. तर सुनिता राजाराम पाटील, निना प्रफुल्ल चौधरी, सर्वेश नितीन चौधरी, अन्वयी नितीन चौधरी (सर्व रा.चिंचोल, ता.मुक्ताईनगर), आदित्य मुकेश पाटील, शंतनू मुकेश पाटील (रा.निंबोल, ता.रावेर) हे जखमी आहेत. लवकरच मुख्यमंत्री सहाय्यक निधी मंजूर होऊन वारसांना मदत दिली जाईल. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठी अपेक्षा; 'ही' मागणी पूर्ण झाली तर दीर्घकालीन प्रतीक्षा संपणार

IPS बुशरा बानो कोण? इन्शाल्लाह म्हटल्यानं वाद, तक्रारीनंतर तडकाफडकी बदली

Solapur News : वित्त आयोग निधी वाटपात पालकमंत्र्यांची मनमानी; जिल्हा परिषद सदस्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केली तक्रार

IPL 2027 Auction कुठे होणार? मागील काही वर्षांत दुबई, जेद्दाह, अबु धाबी येथे झाला होता लिलाव; यावर्षी...

Marathi News Live Updates : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री शिंदेंच्या निवासस्थानी, गणपतीचं घेतलं दर्शन

SCROLL FOR NEXT