उत्तर महाराष्ट्र

महाराष्ट्रातील मार्केट केले काबीज 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : आपल्या मनातील भावनांना कुंचल्यांच्या रेषांमधून मनमोहक आकार दिला.. आणि या कलाकृती पाण्यासारख्या नितळ काचेवर साकारल्या तर ते मनोहारी दृष्य कसे दिसेल? नेमक्‍याच याच कलाविष्काराला उद्योगाचे स्वरुप देत, तो उद्योग विकसित करत जळगावच्या उद्योजिकेने संपूर्ण महाराष्ट्रातील मार्केट काबीज केलंय... या उद्योगातून त्यांनी स्वत:ला सिद्ध तर केलंच, शिवाय अनेकांना रोजगारही उपलब्ध करुन दिलांय.. 

जळगावातील उद्योजिका मिता बनवट. मूळच्या नागपूर येथील. तेथूनच त्यांनी एम.एस्सी. पूर्ण केले. मलकापूरच्या बनवट कुटुंबात त्यांचा विवाह होऊन हा परिवार जळगावात स्थायिक झाला. पती चार्टर्ड अकौंटंट होते. जळगाव एमआयडीसीत त्यांची पाईप फॅक्‍टरीही होती. मिता यांना मात्र पेंटींग, पाककलेची मनापासून आवड. गृहिणी बनून राहण्यापेक्षा काहीतरी करावे, अशी त्यांची इच्छा. पती व कुटुंबातून त्यासाठी प्रोत्साहन मिळाले आणि पती तिलोक यांच्या बी.जे. मार्केटमधील कार्यालयाजवच त्यांनी काचेवरील डिझायनिंगचा छोट्या स्वरुपातील व्यवसाय सुरु केला.. ते 1996चे वर्ष. अवघे 4 हजार रुपये गुंतवून त्यांनी हा व्यवसाय सुरु केला होता. नंतर 1998मध्ये त्यांनी एमआयडीसीतील त्यांच्या पाईप फॅक्‍टरीच्या आवारातच छोट्या जागेत "शिवानी कला कृती' या नावाने ग्लास डिझायनिंगचा उद्योग सुरु केला. 

मेहनतीने मिळविले यश 
व्यवसाय अथवा उद्योग म्हणून निवडलेले हे क्षेत्र नव्हते. तर, मिता यांना कलेची मनापासून आवड असल्याने त्यांनी हा उद्योग विकसित करताना स्वत:ला त्यात झोकून दिले. पती, कुटुंबातील अन्य सदस्यांचे प्रोत्साहन होतेच. परंतु, त्यांच्या सहकार्यावर अवलंबून न राहता मिता यांनी स्वत: यात मेहनत घेतली. नवनवीन डिझायनिंग व ग्लास कटिंगसाठी त्यांनी अद्ययावत यंत्रणा उभी केली. दर्जा आणि गुणवत्ता राखत त्यांनी व्यवसायात वृद्धी केली. राज्यभरात ग्राहकांशी संपर्क वाढविला, त्यातून उद्योग साकार होत गेला. 

तीस जणांचा समूह 
चार हजारांच्या अल्प भांडवलात सुरु केलेला काचेवरील कलाकृतींच्या आविष्काराचा हा उद्योग आज समृध्द झालांय.. त्यामागे मिता यांच्या परिश्रमांचा वाटा महत्त्वपूर्ण आहे. आज त्यांची उलाढाल 2 कोटींवर पोचली असून दोघा महिलांसह तीस जणांचे सहकारी त्यांच्या फॅक्‍टरीत कार्यरत आहेत. ग्लास डिझायनिंगपासून ग्लास फर्निचर व इलेवेशन वर्क, म्युरल, आधुनिक ऍल्युमिनियम सेक्‍शन, फ्रेमलेस ग्लास रॅलिंग, सीएनसी कटिंग वर्क आदी कामे या फॅक्‍टरीत होतात. मुंबई, पुणे, नागपूरच नव्हे तर अन्य प्रांतातूनही मिता यांच्या ग्लास डिझायनिंगला मागणी आहे. 

फॅक्‍टरीला आग, पतीच्या निधनानंतर 
सावरला.. हिंमतने वाढविला उद्योग 

दरम्यानच्या काळात बनवट यांच्या पाईप फॅक्‍टरीला आग लागून ती संपूर्ण खाक झाली. कामगारांचे काय करायचे हा प्रश्‍न असताना तिलोक बनवट यांनी या कामगारांना कायम ठेवायचे, वेतन द्यायचे ठरवले. मिता यांनी पाईप फॅक्‍टरीची जागा ग्लास डिझायनिंगच्या उद्योगासाठी वापरली व या उद्योगात सर्व कामगारांना सामावून घेतले. त्यांना या कामात प्रशिक्षित केले. आठ वर्षांपूर्वी तिलोक यांचे निधन मिता व बनवट कुटुंबीयांना मोठा धक्का होता. त्यातूनही मिता सावरल्या आणि उद्योगाला राज्यात व देशात लौकिक प्राप्त करुन दिला. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT