BJP-Shiv-Sena 
उत्तर महाराष्ट्र

जळगाव मनपात भाजप-शिवसेना एकत्र येणार 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : महापालिकेला भाजप सरकारच्या काळात मुख्यमंत्र्यांनी नगरोत्थान योजनेंतर्गत 100 कोटींचा निधी मंजूर केला होता. या शंभर कोटींतील कामांचे नियोजन करण्यात बराच कालावधी गेल्यामुळे हा निधी खर्च करता आला नाही. याच दरम्यान राज्यात सत्ता परिवर्तन झाले आणि शंभर कोटींच्या कामांच्या निधीला नवीन सरकारने काम सुरू न झाल्यामुळे स्थगिती दिली आहे. ही स्थगिती उठविण्यासाठी शिवसेना व भाजपचे नगरसेवक पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहेत. महापालिकेच्या महापौरपदी भारती सोनवणे यांनी पदभार घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शहरातील रस्ते, गटारी, पथदिवे, भूमिगत गटारी, जलवाहिन्या, लिफ्ट आदी विषयांचा अधिकाऱ्यांकडून आढावा घेण्यात आला. यावेळी भाजप गटनेते, भगत बालाणी, नगरसेवक कैलास सोनवणे, किशोर बाविस्कर, नवनाथ दारकुंडे, चेतन सनकत, सेना नगरसेवक प्रशांत नाईक उपस्थित होते. 

शहरातील विविध प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी मंगळवारी दुपारी महापौर भारती सोनवणे यांच्या दालनात अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत अमृत योजनेंतर्गत सुरू असलेल्या जलवाहिनी व भूमिगत गटारींच्या कामाचा आढावा घेण्यात आला. तसेच लवकरात लवकर कामे मार्गी लावण्यासह एकाच वेळी एका भागातील गटारींचे व जलवाहिनीचे काम हाती घेऊन ते पूर्ण करण्याच्या सूचना करण्यात आल्या. तसेच बंद पडलेले एलईडी पथदिवे त्वरित दुरुस्त करून नवीन एलईडी बसविण्याचे काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आलेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

Maharashtra SSC Exam 2027 : दहावीच्या विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा! बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

IND vs AFG 3rd T20I: अभिषेक शर्माचा विश्वविक्रम अन् भारताचा मालिका विजय! जसप्रीत, नितीशचे खतरनाक यॉर्कर Video

IND vs AFG 3rd T20I: इथे-तिथे-सगळीकडे राशिद खान... भन्नाट रन आऊट अन् दोन अविश्वसनीय झेलने फिरवली मॅच; Video Viral

SCROLL FOR NEXT