suresh bhole 
उत्तर महाराष्ट्र

माझी... आमदारकी संपविण्याची घेतली सुपारी : आमदार सुरेश भोळे 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : "अमृत' योजनेचे काम करताना अधिकारी कंत्राटदारास पाठीशी घालतात. या योजनेच्या कामांवर रस्त्यांची दुरवस्था झाली. नागरिक आम्हाला लाखोली वाहतात. या योजनेतील काम अपूर्ण असल्याने नागरिक आम्हाला म्हणतात काम पूर्ण करा अन्यथा राजीनामा द्या, नाहीतर काळे फासू. अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराला पाठीशी घातल्याने आमच्यावर नागरिकांचे बोलणे ऐकण्याची वेळ आली. अधिकाऱ्यांनी मी आमदारकीचा राजीनामा द्यावा, अशी "सुपारी' घेतली असल्याचा त्रागा आमदार सुरेश भोळे यांनी आज जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीच्या सभेत (दिशा) आज केला. 

नियोजन भवनात ही सभा झाली. अध्यक्षस्थानी खासदार रक्षा खडसे होत्या. खासदार उन्मेष पाटील, आमदार लताताई सोनवणे, आमदार शिरीष चौधरी, जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे, जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ.बी.एन.पाटील व्यासपीठावर उपस्थित होते. 
खासदार खडसेंनी अमृत योजनेच्या कामाची माहिती असता, अमृतचे काम जळगावला 44 टक्के पूर्ण झाले आहे. कंत्राटदाराने सबकंत्राटदार नेमला. त्याला पेमेंट मूळ कंत्राटदाराने लवकर न दिल्याने काम गेले काही महिने बंद होते. काम पूर्ण करावयाची मुदत दोन वर्षे होती.तीही पूर्ण झाली. असे माहिती महापालिकेचे अभियंता भोळे, बोरोले यांनी दिली. त्यावर खासदारांसह जिल्हाधिकारी संतप्त झाले. जर काम वेळेत पूर्ण झाले नाही तर तुम्ही काय कारवाई केली ? ज्या स्टेपवर काम पूर्ण व्हायला पाहिजे तेव्हाच तुम्ही नोटीस का दिली नाही, त्याला ब्लॅकलिस्ट का केले नाही. एकावेळी भुयारी गटारी, अमृत योजनेचे व रस्त्यांची कामे का केली नाही. आता दोन वर्षानंतर आम्हाला माहिती देताहेत कंत्राटदाराने सब कंत्राटदार नेमला आहे.


भोंळेंचा त्रागा.. 
आमदार भोळे यांनी अधिकाऱ्यांच्या कामाबाबत त्रागाच केला. अध्यक्ष महोदय अधिकारी ऐकत नाही, कंत्राटदाराला पाठीशी घालतात. अनेक शासकीय योजनांची माहिती लोकप्रतिनिधींना देत नाही. याच्या नाकर्तेपणामुळे अनेक रस्त्यांची बिकट अवस्था झाली. नागरिक आम्हाला कामे करा नाहीतर राजीनामा द्या, असे सांगतात. अधिकाऱ्यांचा नाकर्तेपणामुळे त्यांनी मी आमदारकीचा राजीनामा द्यावा अशी सुपारीचे घेतली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT