shiv bhojan thali 
उत्तर महाराष्ट्र

महा अन्नपूर्णा ऍप' द्वारे मिळणार शिवभोजन 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव ः राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी असलेल्या "शिवभोजन' योजना उद्यापासून शहरातील दोन केंद्रावर सुरू होत आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते उद्‌घाटन होईल. केंद्रावर गर्दी होऊन गोंधळ होऊ नये यासाठी पोलिस बंदोबस्त केंद्रावर राहील. जो पहिले येईल त्याला शिवभोजन मिळेल. त्यासाठी आज केंद्र चालकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. "महा अन्नपूर्णा' ऍपद्वारे लाभार्थ्यांचा फोटो घेऊन "आयडी' मिळेल, दहा रुपये दिल्यानंतर त्याला शिवभोजन घेता येईल. शहरात दोन केंद्रांना प्रत्येकी 75 थाळी देण्यात येईल. 

राज्यातील गरजू, गरीब नागरिकांसाठी शिवभोजन योजना आहे. दहा रुपयांत त्यांना भोजन मिळेल. मात्र त्यासाठी कोण लाभार्थी असतील याचे निकष नाहीत. यामुळे जो पहिले येईल त्याला शिवभोजन देण्यात येईल. दहा रुपयात जेवण भेटणार असल्याने गर्दी होऊन गोंधळ होईल. यासाठी पुरवठा विभागाने केंद्रावर पोलिस बंदोबस्त मागविला आहे. तसे पत्रही पोलिसांना देण्यात आले आहे. जळगाव जिल्ह्यासाठी या योजनेचा कोटा 700 थाळी एवढा आहे. राज्याचा कोटा 18 हजार थाळींचा आहे. ही योजना प्रायोगिक तत्त्वावर तीन महिन्यांसाठी आहे. 

"महाअन्नपूर्णा ऍप' लॉंच 
शिवभोजन अंतर्गत केंद्र चालकांना आजही प्रशिक्षण देण्यात आले. शिवभोजन देताना "महा अन्नपूर्णा ऍप' डाऊनलोड करून त्याद्वारे शिवभोजनास येणाऱ्या लाभार्थ्यांचा फोटो काढणे, त्याला आयडी देणे, नंतर भोजन देणे या प्रक्रिये माहिती देण्यात आली. 

दोन ठिकाणी शिवभोजनालय 
- जिल्हा रुग्णालय : साई मल्टी सर्व्हिसेस 
- नवीन बसस्थानक परिसर : क्षुधाशांती केंद्र 
- जो प्रथम येईल त्याला भोजन 
- आधारकार्ड गरजेचे नाही 
- भोजनाची वेळ दुपारी बारा ते दोन 

शिवभोजन योजनेंतर्गत उद्या (ता.26) दोन ठिकाणी केंद्रे सुरू होतील. बारा ते दोन भोजनाची वेळ आहे. पोलिसांना केंद्रावर पोलिस बंदोबस्तासाठी पत्र दिले आहे. नंतर टप्प्यांनी इतर केंद्र सुरू होईल. 
- सुनील सूर्यवंशी 
जिल्हा पुरवठा अधिकारी, जळगाव 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी! भिवंडीत १० किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा, १५ मिनिटांच्या प्रवासाला तब्बल ३ तास

Asian Games 2026: भारताविरुद्धच्या फायनलमध्ये इराणच्या खेळाडूंचे वागणे संशयास्पद; चौकशी झाली तर अधिकाऱ्यांसह सारेच अडकणार, नेमकं काय झालंय?

MGNREGA History : मागेल त्याला काम ते सांगलीच्या सुपुत्राची दूरदृष्टी; एसटीच्या 15 पैशांच्या अधिभारातून कशी उभी राहिली देशाची 'रोजगार हमी योजना'? एका पत्राने बदलला महाराष्ट्राचा इतिहास

Latest Marathi News Live Update : मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात मनसे-ठाकरे गटाचा ४ ऑक्टोबरला संयुक्त मोर्चा

Adul Ganesh Mandal: डिजेचा खर्च टाळून गणेश मंडळाची शाळेला ५० हजारांची मदत

SCROLL FOR NEXT