polise logo 
उत्तर महाराष्ट्र

गुन्हेशाखेवर पोलिस अधीक्षकांची "सर्जिकल स्ट्राईक' 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यात वाढते गुन्हेगारीचे प्रमाण, चोऱ्या, घरफोड्या, लुटमारीचे गुन्हे आदी दाखल गुन्ह्यांचा तपास लावण्यासाठी विशेष मोहिमेंतर्गत गुन्हेशाखेला 1 महिन्याचा अल्टिमेटम देण्यात आला होता. मात्र, तरी सुद्धा कामगिरीचा आलेख उंचावत नाही म्हणून पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी प्रेरणा सभागृहात कर्मचाऱ्यांची एकत्र बैठक घेत तीन कर्मचाऱ्यांच्या बदल्या तर एका कर्मचाऱ्यांच्या चौकशीचे आदेश बैठकीतच दिल्याने पोलिस दलात एकच भूकंप झाला आहे. 
गुन्हे उघडकीस आणण्याऐवजी भलत्याच कामात कर्मचारी व्यस्त असल्याचे आढळून आल्यावर अवैध धंद्यांच्या संपर्कातील कर्मचाऱ्यांवर पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी स्वत: गुप्तपणे प्रत्येकच कर्मचाऱ्यावर विशेष लक्ष केंद्रीत केले होते. अशातच जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी, घरफोड्या, चोऱ्या, जबरीलुटचे गुन्हे आणि दाखल गुन्ह्यांच्या तपासात खालावलेली परिस्थिती पाहता डॉ. उगलेंनी या कर्मचाऱ्यांची गेल्या महिन्यात बैठक घेत कामगिरी दाखवण्याच्या सूचना केल्या होत्या. गेल्या महिन्याभरात कामगिरी शून्य आणि अवांतर विषयात सक्रिय असलेल्या कर्मचाऱ्यांची यादीच पोलिस अधीक्षकांच्या हाती लागली असून, प्रेरणा सभागृहात पोलिस अधीक्षकांनी खास गुन्हे आढावा बैठक घेतली होती. या बैठकीत उपस्थित कर्मचारी अधिकाऱ्यांना तपासातील प्रगती आणि आढावा सादर करावा लागला. 

कठोर शब्दात कान उघाडणी 
पोलिस अधीक्षकांनी अखेरचा अल्टिमेटम देत प्रत्येकाची कुंडलीच आपल्याकडे तयार असून, वेळीच कामांत सुधारणा झाली नाही तर बडतर्फीची कारवाई करण्याचा इशारा बैठकीत दिला आहे. जिल्हा पोलिस दलात कार्यरत अधिकारी असोत की, कर्मचारी अवांतर विषयात असणाऱ्या प्रत्येकाचे कारनामे आपल्या पर्यंत पोहचत असल्याचेही त्यांनी ठणकावून सांगितले. 

तिघांच्या बदल्या 
गुन्हेशाखेतून सुरेश महाजन यांची भुसावळ तालुका, दीपक शिंदे, वसंत लिंगायत यांची मुख्यालयात तडकाफडकी बदली करण्यात आली. तर विनोद संभाजी पाटील यांच्या चौकशीचे आदेश बैठकीतूनच देण्यात आले. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या आजच्या बैठकीत पोलिस अधीक्षकांच्या कारवाईने पोलिसदलात एकच खळबळ उडाली असून, अवैध धंद्यात लिप्त अधिकारी कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT